Congress on BJP Manifesto : संकल्पपत्राचे नाव माफीनामा पाहिजे; काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

Congress on BJP Manifesto : संकल्पपत्राचे नाव माफीनामा पाहिजे; काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज सकाळी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाचे संकल्पपत्र असे जाहीरनाम्याचे नाव असून पक्षाने गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र भाजपाच्या या जाहीरनाम्याची काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. भाजपाच्या संकल्पपत्राचे नाव माफीनामा पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केले आहे. (Lok Sabha Election 2024 BJPs manifesto name should be Apology Congress Criticism)

भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, पक्षाला महागाईची अजिबात चिंता नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, एमएसपी वाढवून कायदेशीर हमी देऊ, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एवढे मोठे काम केले नाही. जेणेकरून देशातील सर्व लोकांना फायदा होईल. सध्याच्या काळात तरुण नोकरीच्या शोधात आहे. महागाई गगनाला भिडत आहे. मात्र मोदींना महागाई आणि बेरोजगारीची चिंता नाही. मोदी 10 वर्षांत गरिबांसाठी काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. त्यांच्या जाहीरनाम्यावरून हेच सिद्ध होते की, भाजपाकडे लोकांना देण्यासारखे काही नाही, असा टोलाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.

हेही वाचा – Sharad Pawar: यंत्रणांचा गैरवापर हेच मोदींचं सूत्र, रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र…;पवारांचं टीकास्त्र

संकल्पपत्राचे नाव माफीनामा पाहिजे – पवन खेरा 

काँग्रेस नेते पवन खेरा भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका करताना म्हणाले की, यमराजांनी एक मशीन बनवलं होतं, ज्यामध्ये खोटं बोलल्यावर घंटा वाजू लागते. आज सकाळपासून ती घंटा सतत वाजत आहे. आश्चर्यचकित होऊन यमराजांनी चित्रगुप्ताला विचारलं की, ही घंटा का वाजतेय? चित्रगुप्त म्हणाले की, महाराज, आज मोदींच्या संकल्प पत्र प्रसारीत होणार आहे. भाजपाच्या या संकल्प पत्राला आमचा तीव्र आक्षेप आहे, त्याचे नाव ‘माफीनामा’ असावे. मोदींनी देशातील दलित, शेतकरी, तरुण, आदिवासींची माफी मागायला हवी, असे पवन खेरा यांनी म्हटले.

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा (BJP manifesto Important announcements) 

हेही वाचा – Lok Sabha 2024 : खासगी विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणी वाढली

First Published on: April 14, 2024 3:14 PM
Exit mobile version