घरमहाराष्ट्रSharad Pawar: यंत्रणांचा गैरवापर हेच मोदींचं सूत्र, रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र...;पवारांचं...

Sharad Pawar: यंत्रणांचा गैरवापर हेच मोदींचं सूत्र, रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र…;पवारांचं टीकास्त्र

Subscribe

लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका, असं सांगणं म्हणजे रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यात काहीही फरक नाही, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

सोलापूर: लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका, असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र यात काहीही फरक नाही, असा  जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. ते सध्या अकलूजमध्ये आहेत. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच, धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती देखील शरद पवारांनी दिली. (There is no difference between Russia s Putin and India s Narendra Criticized by Sharad Pawar )

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्त शरद पवार हे अकलूजमध्ये होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

- Advertisement -

पुतीन आणि मोदी यांच्यात फरक नाही

पंतप्रधान हे त्यांच्या पदाची अप्रतिष्ठा करत आहेत. आपला कार्यक्रम सांगण्याऐवजी नेहरुंवर टीका करत आहेत. त्यांचं भाषण ऐकलं ते म्हणतात की, विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून देऊ नका. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्ष असावा लागतो. यामुळे रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.

भाजपाने जाहीरनाम्यात काय आश्वासन दिले यावर भाष्य करणे आता योग्य वाटत नाही. नुसते आश्वासन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ईडी-सीबीआयचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते विजयी होणार …

माढामध्ये आमची इच्छा होती की धैर्यशील यांनी ही निवडणूक लढवावी. आज जयंत पाटील या ठिकाणी येतील आणि त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. 16 तारखेला माढा आणि सोलापूर संदर्भात बैठक होईल. एकत्रपणे काम करण्याचा निर्णय झाला आहे. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते हे मोठ्या मताने विजयी होतील, अशी खात्री सहकाऱ्यांनी दिल्याचेही शरद पवार म्हणाले.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : निवडणुकांच्या निमित्ताने का होईना…, अंबादास दानवेंची अमित शहांवर टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -