PM Narendra Modi : तरीही तुम्ही निवडणुका का हरलात? काँग्रेसच्या आरोपांचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार

PM Narendra Modi : तरीही तुम्ही निवडणुका का हरलात? काँग्रेसच्या आरोपांचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यांतील मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Lok Sabha Election 2024 : ed cbi were your puppets why lose 2014 elections pm modi angry over congress allegations using central agency to win polls)

सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणा असूनही…

काँग्रेसच्या आरोपांचा समाचार घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 पूर्वी सीबीआय आणि ईडी या यंत्रणा तर त्यांच्याच ताब्यात होत्या. मग तरीही ते निवडणुका का हरले? ईव्हीएममध्ये गडबड करण्याचे आरोप हे निराधार असल्याचे सांगतानाच एवढ्या मोठ्या देशातील एखाद्या पालिकेच्या निवडणुका देखील फिक्स करता येत नाहीत. मग देशाच्या निवडणुका कशा फिक्स केल्या जातील, अशी विचारणा देखील त्यांनी केली. विरोधी पक्ष जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024: बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकत नाहीत; तर…; मोदींनी स्पष्टच सांगितलं

एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2014 मध्ये या सरकारी यंत्रणा त्यांच्याच ताब्यात होत्या, तरीही ते निवडणूक का हरले? तेव्हाचे गुजरातचे गृहमंत्री अमित शाह यांना देखील त्यांनी तुरुंगात टाकले होते, तरीही त्यांचा पराभव का झाला? ईडी, सीबीआय जर निवडणुका जिंकून देत असतील तर सर्वाधिक काळ या यंत्रणा काँग्रेसच्या ताब्यात होत्या, मग त्यांनी सगळ्याच निवडणुका जिंकल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला. (Lok Sabha Election 2024 : ed cbi were your puppets why lose 2014 elections pm modi angry over congress allegations using central agency to win polls)

कदाचित ही पराभवानंतरची रणनीती

पंतप्रधान म्हणाले की, एवढ्या मोठ्या देशातील निवडणुका फिक्स करता येऊ शकतात का, याचा विचारही आरोप करताना केला जात नाही. इथे एका नगर पालिकेची निवडणूक देखील फिक्स होऊ शकत नाही. असं फिक्सिंग होऊच शकत नाही. विरोधक सध्या जनतेची दिशाभूल करत आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटते की, याबाबत विरोधकांना विचारण्याऐवजी प्रसारमाध्यमे याबाबत आम्हाला विचारतात. ईव्हीएम, केंद्रीय यंत्रणा याबाबतचे आरोप म्हणजे इंडी आघाडीची निराशा आहे. गेल्या काही दिवसात विरोधक फारच निराश झाले आहेत. पराभवानंतरही लोकांना सामोरे जावेच लागते. त्यामुळेच ते अशी काही न काही करणे शोधात आहेत. ही कदाचित त्यांची पराभवानंतरची रणनीती असेल.

हा तर शहरी नक्षलवाद

पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील टीका केली. या जाहीरनाम्याची प्रेरणा मुस्लिम लीगकडून घेतल्यासारखे वाटत आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांचा संपत्तीच्या पुनर्वाटपाचा विचार हा शहरी नक्षलवाद असल्याचे म्हटले आहे. अशा माओवादी विचारसरणीमुळे कधीच कोणाचे भले झालेले नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. (Lok Sabha Election 2024 : ed cbi were your puppets why lose 2014 elections pm modi angry over congress allegations using central agency to win polls)

हेही वाचा – Narendra Modi Rally in Pune : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची घणाघाती टीका


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 29, 2024 9:21 PM
Exit mobile version