लोकसभा २०१९ : समाजवादी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लोकसभा २०१९ : समाजवादी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसनंतर आता समाजवादी पक्षाने ६ उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. यात समाजवादीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव हे मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर धमेंद्र यादव यांना बदायूं येथून तर पक्षाचे महासरचिटणीस राम गोपाल यादव यांचे पूत्र अक्षय यादव यांना फिरोजाबाद येथून समाजवादीने तिकीट दिले आहे. कमलेश कठेरिया (इटावा), भाईलाल कोल (राबर्ट्सगंज), शब्बीर वाल्मिकी (बहराइच) अशी इतर उमेदवारांची नावं आहेत.

सपा-बसपाची महाआघडी लढवणार ३८ जागा 

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत समाजवादीला ८० जागांपैकी केवळ ५ जागा जिंकता आल्या होत्या. त्यात मुलायम सिंह यांच्यासह त्यांचा पुतण्या धमेंद्र यादव, अक्षय यादव आणि सून डिंपल यादव यांचा समावेश होता. गेल्या निवडणुकीत मुलायम सिंह यांनी मैनपुरी येथून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, दोन्ही जागांवर निवडून आल्यानंतर त्यांनी आजमगड जागा आपल्याकडे ठेवली. तर मैनपुरी येथील जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत मुलायम यांच्या कुटुंबातील तेज प्रताप यादव विजयी झाले होते. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची महाआघाडी झाली असून प्रत्येकी ३८ जागांवर लढणार आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेससह सपा आणि बसपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

First Published on: March 8, 2019 1:50 PM
Exit mobile version