घरमुंबईहॉटेलच्या बाहेर 'हलाल' चा फलक लावा - समाजवादी पक्ष

हॉटेलच्या बाहेर ‘हलाल’ चा फलक लावा – समाजवादी पक्ष

Subscribe

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून शाकाहारी आणि मांसाहारी यावरून वाद सुरू असताना आता मुस्लीम धर्मियांनी एक वेगळी मागणी केली आहे. हॉटेलच्या बाहेर 'हलाल' चा फलक लावण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.

मुंबईत शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद सुरू असताना, आता मांसाहार करणाऱ्या मुस्लिम धर्मियांकडून वेगळी मागणी केली जात आहे. मुस्लिम धर्मात हलाल पद्धतीने कापले गेलेले मांस मटणाचे सेवन अनिवार्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मांस मिळावे अशी मागणी करत प्रत्येक हॉटेल्सच्या बाहेर हलाल पद्धतीने कापल्या गेलेल्या मांसाचा वापर केला जातो, अशा प्रकारचे फलक लावले जावे, अशी मागणी समाजवादी पक्षाच्यावतीने होत आहे.

हॉटेल्समध्ये हलाल पद्धतीचे मांस मटण

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून शाकाहारी आणि मांसाहारी यावरून वाद सुरू आहे. मांसाहार करणाऱ्यांना शाकाहार करणाऱ्या व्यक्ती आपल्या इमारतीत घर नाकारत आहेत. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना हीन वागणूक दिली जात असल्याने मनसेने तसेच कांग्रेसने तीव्र आंदोलन करून याचा निषेध केला होता. मात्र, या वादानंतर आता मुस्लिम बांधवांनी हलाल पद्धतीने केलेले मांसाहार मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. समाजवादी पक्षाचे महापलिका गटनेते रईस शेख यांनी, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देऊन प्रत्येक हॉटेल्स बाहेर हलाल पद्धतीचा मांसाहार अशाप्रकारचे फलक लावले जावेत अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

शाकाहारी-मांसाहारी वादानंतर मुस्लीम धर्मियांनी केली ही मागणी

मुस्लिम धर्मात विशिष्ट प्रकारे प्राण्यांची कत्तल केली जाते, त्याला हलाल असे म्हटले जाते. याच विशिष्ट पद्धतीने कत्तल केलेल्या मांसाचे सेवन करणे मुस्लिम धर्मियात अनिवार्य असते. परंतु मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये हलाल पद्धतीचा अवलंब करून मांसाहारी खाद्यपदार्थ तयार केले जातात किंवा नाही याबाबत प्रत्येक मुस्लिम धर्मियांमध्ये शंका असते. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम धर्मीय मांसाहारी पदार्थ जाऊन खाण्याचे टाळतात, असे रईस शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल्स मध्ये ज्याप्रमाणे हलाल बाबत फलक लावले जातात, त्याच धर्तीवर मुंबईतील हॉटेल्समध्येही असे फलक लावले जावेत. जेणेकरून मुस्लिम धर्मियांना विश्वासाने जाऊन हॉटेल्स मध्ये मांसाहार खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद लुटता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील नागरिकाने काय करावे किंवा काय करू नये, किंबहुना मांसाहार करावा किंवा करू नये असे माझे काही म्हणणे नाही. तसेच हॉटेल चालकाने हलाल केलेल्या खाद्यपदार्थाची विक्री करावी किंवा करू नये असे आमचे काहीही म्हणणे नसून केवळ हलाल पद्धतीच्या मांस मटणाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये होत असेल तर तिथे फलक लावावा, जेणेकरून ज्या हॉटेलमध्ये हलाल पद्धतीचे मांसमटण असेल तिथे मुस्लिम बांधव जेवणास जाऊ शकतो, असेही रईस शेख यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

वाचा – शाकाहारी-मांसाहारी वाद पेटला; शाळांमध्ये मांसाहार बंदी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -