अमेरिकेत २५ फुटांची हनुमानाची भव्य मूर्ती विराजमान!

अमेरिकेत २५ फुटांची हनुमानाची भव्य मूर्ती विराजमान!

अमेरिकेत २५ फुटांची हनुमानाची भव्य मूर्ती विराजमान!

पवनसूत हनुमानाची भव्य मूर्ती अमेरिकेतील हॉकेंसिन या शहारात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. एकाच दगडाचा वापर करून मनुष्यबळाने अविरत श्रम घेऊन तेलंगणातील वरंगलामध्ये तयार केली आहे. १२ मूर्तीकारांनी वर्षभराच्या अथक श्रमानंतर हनुमानाची ही मूर्ती तयार केली. त्यानंतर अमेरिकेत जहाजाने पाठवण्यात आली. या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अमेरिकेत समारंभ आयोजित करण्यात आला. हॉकेंसिन शहरातील ३०० पेक्षा जास्त हिंदू कुटुंब या समारंभात सहभागी झाले होते.

अमेरिकेतील हॉकेंसिग शहरात या मूर्तीची दहा दिवस पूजाविधी करण्यात आली. द हनुमान प्रोजेक्‍टसच्या माध्यमातून या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सुंदर कलात्मक नक्षीकाम केलेली ही मूर्ती ग्रॅनाइटच्या एकाच दगडापासून तयार केलेली आहे. या मूर्तीची उंची २५ फूट असून वजन ३० हजार किलोग्रॅम आहे. या मूर्तीसाठी १ लाख डॉलर्स खर्च केल्याचे सांगितले जात आहे.

हनुमानाची ही भव्य मूर्ती जानेवारी महिन्यात जहाजाने हैदराबादहून न्यूयॉर्ककडे रवाना झाली होती. त्यानंतर अमेरिकेत पोहोचवल्यावर एका ट्रकमध्ये मूर्ती घेऊन डेलावेयरच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिरापर्यंत नेण्यात आली. या मूर्तीची पूजा बंगळूरुचे पुजारी नागराज भट्टार यांनी केली. अमेरिकेचे अनेक नेते मंडळी देखील या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी उपस्थित होते.


हेही वाचा – तैवान वेबसाइटवरील ‘भगवान राम चिनी ड्रॅगनला मारताना’चा फोटो झाला व्हायरल


 

First Published on: June 18, 2020 1:44 PM
Exit mobile version