LockDown: मश्जिदमध्ये नमाज पठनासाठी अडवल्याने पोलिसांवरच हल्ला; २३ जण ताब्यात

LockDown: मश्जिदमध्ये नमाज पठनासाठी अडवल्याने पोलिसांवरच हल्ला; २३ जण ताब्यात

लखनौमधील विविध क्षेत्रात नमाज पठनासाठी लोकं मश्जिदमध्ये एकत्र जमत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी चक्क पोलिसांवरच हल्ला चढवला. पोलिसांनी या प्रकरणी ३१ जणांवर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून २३ जणांचा त्यांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांना दिहवाकला येथील मश्जिदमध्ये नमाज पठनासाठी लोकं जमली असल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर नमाज पठन करण्यासाठी जमलेल्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. काही वेळाने पोलिसांनी प्रकरण नियंत्रणात आणले.

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांना दिहवाकला येथील मश्जिदमध्ये नमाज पठनासाठी लोकं जमली असल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर नमाज पठन करण्यासाठी जमलेल्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. काही वेळाने पोलिसांनी प्रकरण नियंत्रणात आणले. मौलाना सईद, गुल्लऊ, इरफान, सद्दाम, अनवर अली, मो. अतीक, मो. सईद, जाकिर, ताज मोहम्मद, हजरद्दीन, ताहिर, ननकऊ, लुकमान, नफीस, इसारत, जाकिर, बदलू, अलीयार, सद्दीक, सूफियान, लल्लन, जाबिर अली, अली मोहम्मद यांच्या विरोधात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच मश्जिदीच्या मौलवींसह आठ लोकांवर हत्येचा प्रयत्न, गोंधळ घालणे आणि मारामारी केल्याप्रकरणी इतर कलमांखाली गुन्हा दाखल करत कारवाई केली.

हेही वाचा –

धक्कादायक : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

First Published on: April 25, 2020 12:01 AM
Exit mobile version