आठवड्यातून फक्त ५ दिवस कार्यालये-बाजारपेठ सुरू राहणार; योगी सरकारचा निर्णय!

आठवड्यातून फक्त ५ दिवस कार्यालये-बाजारपेठ सुरू राहणार; योगी सरकारचा निर्णय!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता आठवड्यातून फक्त पाच दिवस कार्यालय आणि बाजारपेठ सुरू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत कार्यालये व बाजारपेठा उघड्या राहणार आहे, तर शनिवारी व रविवारी सर्व कार्यालये व बाजारपेठा पूर्णपणे बंद राहतील.

दरम्यान, योगी सरकारने गेल्या शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटे ५ पर्यंत ५५ तासांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. आता हा नवा नियम पुढेही लागू राहणार आहे. दोन दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा सुरू राहणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत आपल्या टीम -११ सह सहमती दर्शविली. रविवारी झालेल्या या बैठकीत अनलॉक झाल्यानंतर कोरोना संसर्गाची रूग्ण वाढल्याची चर्चा झाली. त्यानंतर सरकारी आणि खासगी कार्यालये आठवड्यातून फक्त पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय बाजारपेठ, शहरी व ग्रामीण काही भाग तसेच अन्य व्यावसायिक संस्था देखील बंद राहणार आहे. यावेळी आवश्यक वस्तू व सेवा सुरू राहणार असल्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.


‘सरकार पाडून दाखवाच’, संजय राऊतांचं भाजपला थेट आव्हान!

First Published on: July 12, 2020 1:27 PM
Exit mobile version