LockDown : मध्य प्रदेशच्या राजधानीत १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

LockDown : मध्य प्रदेशच्या राजधानीत १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन २४ जुलै ते २ ऑगस्ट या काळात लागू करण्यात आला आहे. या दरम्यान, मेडिकल सेवा, सरकारी राशनची दुकाने खुली राहणार आहेत. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भोपाळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून ही साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. भोपाळमधून बाहेर ये – जा करण्यास निर्बंध घालण्यात आले असून सरकारने ई-पास जारी केला आहे. गृहमंत्र्यांनी लोकांना लॉकडाऊनच्या काळात नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत २४ हजार ८४२ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ७ हजार २३६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत १६ हजार ८३६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात ७७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर भोपाळ शहरात ४ हजार ५१२ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी १ हजार ३३० अॅक्टिव्ह केसेस आहेत. येथील ३ हजार १३८ रूग्ण बरे झाले असून १४२ जणांचा मृतू येथे झाला आहे.

देशात कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढत असून देशात आतापर्यंत १२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. तर रिकव्हरी रेट ६३ टक्के इतका झाला आहे. covid19india.org मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आता १२ लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी सकाळपर्यंत ११ लाख ९२ हजार ९१५ इतकी होती. एकीकडे २८ हजार ७३२ जणांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ७ लाख ५३ हजार ०५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा –

पत्नीचे १४ प्रियकर! पतीने सर्वांना पाठविली नोटीस अन्…

First Published on: July 22, 2020 11:22 PM
Exit mobile version