घरदेश-विदेशपत्नीचे १४ प्रियकर! पतीने सर्वांना पाठविली नोटीस अन्...

पत्नीचे १४ प्रियकर! पतीने सर्वांना पाठविली नोटीस अन्…

Subscribe

कोलकात्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही

कोलकात्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. यामुळे पतीने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध शोधण्यासाठी सतत हेरगिरी केली. यानंतर ते प्रकरण उघडकीस आले आणि त्याचे सत्य खूप धक्कादायक होतं. त्याच्या पत्नीला एक नाही दोन नाही तर तब्बल १४ प्रियकर आहेत असे त्याला लक्षात आले आहे. यानंतर, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर त्याने केलेल्या कृत्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

बंगाला इंडियन एक्सप्रेसनुसार पत्नीचे १४ पुरुषांशी अनैतिक संबंध उघडकीस आणल्यानंतर नवऱ्याने सर्वांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. पतीने १४ पुरुषांकडून नुकसान भरपाई म्हणून १०० कोटींची मागणी देखील केली आहे. त्याने असेही सांगितले की, १४ लोकांसोबतच्या अनैतिक संबंधांमुळे त्याच्या पत्नीचे आणि त्याचे वैवाहिक जीवन बिघडले आहे.

- Advertisement -

या महिलेचा नवरा कोलकातेत बिझनेसमन आहे. या पुरुषांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन उध्वस्त झाले आहे असा त्याचा आरोप आहे. त्याची समाजातील प्रतिष्ठाही कलंकित झाली आहे. म्हणून त्याने आपल्या कार चालकाला हेर बनवून प्रत्येकाविरूद्ध पुरावे गोळा केले आहेत. पतीने १४ लोकांना स्वतंत्र नोटिस पाठविल्या आहेत. त्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, नोटीस मिळाल्यानंतर २ आठवड्यांच्या आत मानहानीची हानी भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नोटीसमध्ये पतीने असे लिहिले आहे की, “मला कळले आहे की तुम्ही लोक माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवता आणि गोपनीयतेने माझ्या पत्नीशी संपर्क साधत आहात.”

पुढे त्याने असे लिहिले की, ‘ती विवाहित आहे हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. तसेच, तुम्हाला हे देखील माहित आहे की मी तिचा नवरा आहे. माझं वैवाहिक आयुष्य तुमच्या अनैतिक संबंधांमुळे बिघडलं आहे. मी संकटात जगत आहे माझी सामाजिक प्रतिमा कलंकित झाली आहे. तुमच्या सर्वांना २ आठवड्यांच्या आत मानहानी म्हणून १०० कोटी रुपये द्यावे लागतील. तुम्ही हे न केल्यास तुमच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


‘Chutia ही शिवी नसून एक समाज आहे’, नोकरीचा अर्ज नाकारल्यानंतर आसामी महिलेची पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -