मध्यप्रदेशमध्ये भाजप कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन

मध्यप्रदेशमध्ये भाजप कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन

भोपालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा महाकुंभ

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यामध्ये भाजपच्या यात्रेला देखील सुरुवात झाली असून आज भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी भाजपकडून महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजचे अध्यक्ष अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवाराज सिंह चौहानसोबतच अनेक दिग्गज नेते या महाकुंभाला उपस्थित राहणार आहे. भोपाळच्या जंबूरी मैदानात या कार्यकर्त्या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर म्हणजे पं. दीनद्याल उपाध्याय यांची जयंती असून त्याचे औचित्यसाधत या महाकुंभाचे आयोजन केले आहे.

६ हजार सुरक्षारक्षक तैनात

भाजपच्या महाकुंभाला १० लाख भाजप कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. या महाकुंभा दरम्यान मोदी जवळपास ३ तास भोपाळ शहरात असणार आहे. या महाकुंभ मेळाव्या दरम्यान सुरक्षिततेची देखील तितकीच काळजी घेण्यात आले आहे. जवळपास ६ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षारक्षकांमध्ये ४ हजार सेंट्रल रिजर्व फोर्सचे जवान आहेत. २२ आयपीएस अधिकाऱ्यांवर सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधासभा निवडणुक होणार आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे.

१० लाखांपेक्षा अधिक कार्यकर्ते येणार

महाकुंभातून कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार होईल. २००८ आणि २०१३ मध्ये देखील अशाच महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा भाजपने विजय मिळवला होता. यावेळी सुध्दा कार्यकर्ते महाकुंभाच्या तयारीला लागले आहेत. हे आव्हान मोठे आहे. हा कार्यक्रम मोठा असून त्या दृष्टीने आम्ही योग्य ती तयारी केली असल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. या महाकुंभाला २३० विधानसभा क्षेत्रातील ६५ हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी सांगितले. भाजपने दावा केला आहे की, या कार्यक्रमाला १० लाखापेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभा मंडपापर्यंत पोहचण्यासाठी २० गेट बनवण्यात आले आहे.

First Published on: September 25, 2018 12:36 PM
Exit mobile version