लॉकडाऊनमध्ये प्रेयसी विवाहित प्रियकराच्या घरी गेली आणि…

लॉकडाऊनमध्ये प्रेयसी विवाहित प्रियकराच्या घरी गेली आणि…

लॉकडाऊनमध्ये प्रेयसी विवाहित प्रियकराच्या घरी गेली आणि...

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे याचा प्रेमीयुगुलांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. मात्र, असे असताना देखील प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशमधील भोपाळ याठिकाणी अशी एक घटना घडली असून एक ५७ वर्षीय प्रेयसी आपल्या विवाहित प्रियकराला भेटण्यासाठी चक्क लॉकडाऊन असतानाही घरी गेल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

भोपाळ येथे एक ५७ वर्षीय सरकारी नोकरी करणाऱ्या महिलेने ४५ वर्षीय विवाहित प्रियकराच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला ‘मला तुझा नवरा दे. याकरता मी माझी जमीन आणि इतर संपत्ती तुला त्या बदल्यात देते’, असे तिने सांगितले. त्यामुळे हा सर्व प्रकार पाहून प्रियकराच्या पत्नीला धक्काच बसला. त्यानंतर प्रियकराच्या पत्नीने तिला तू येथून निघून जा, असे देखील सांगितले. मात्र, पतीच्या प्रेयसीने घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर पतीच्या पत्नीने महिलेच्या मुलाला, तिच्या सूनेला आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर त्यांनी तिला या घटनेबाबत जाब विचारला. दरम्यान, ती म्हणाली की, ‘हा माझा सहकारी असून गेले दोन महिने लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही भेटलो नाही. त्यामुळे मी त्याला भेटण्यासाठी आणि येथून घेऊन जाण्यासाठी आली आहे.’

विचारणा केली असता म्हणाला…

या महिलेच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. तर त्या प्रियकराचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. दरम्यान, याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता ‘ती माझी फक्त मैत्रिण असून ती सध्या एकटी असल्याने ती घाबरली आहे. त्यामुळे ती मला भेटण्यासाठी आली असल्याचे त्यांनी सांगितले.’ तर प्रियकराच्या पत्नीने आपल्या पतीने आपला विश्वास घात केल्याचे सांगितले आहे. तसेच मी या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही, असे देखील ती पुढे म्हणाली.


हेही वाचा – तळीरामांसाठी गुड न्यूज; वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार


 

First Published on: May 1, 2020 7:47 PM
Exit mobile version