मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक : RSS ने केलेल्या सर्व्हेमुळे BJP मध्ये अस्वस्थता; काँग्रेसचा दावा

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक : RSS ने केलेल्या सर्व्हेमुळे BJP मध्ये अस्वस्थता; काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पक्षाचा तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आगामी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींबाबत  मोठा दावा केला आहे. काँग्रेसने म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) मध्य प्रदेशात केलेल्या सर्व्हेमुळे भाजपास अस्वस्थता आहे, असा दावा केला आहे.

काँग्रेसने आपल्या ट्विटरवर म्हटले की, या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक सर्वेक्षणे समोर आली असून त्यात राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाजपच्या जागा 55 पेक्षा कमी होत आहेत. 2018 मध्ये काँग्रेसचे 15 महिने कार्यकाळ आहे आणि कमलनाथ यांच्यासारख्या निर्विवाद आणि अनुभवी नेत्याचा पाठिंबा आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचत आहे. (Madhya Pradesh Vidhan Sabha Elections: Unrest in BJP due to Survey by RSS; Congress claims)

भाजपकडे 18 वर्षांची जबाबदारी आणि अपूर्ण घोषणा आहेत. त्यामुळे गंभीर सत्ताविरोधी लाटेचे रूप धारण झाले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 संदर्भात गेल्या 5 महिन्यांत 6 वेगवेगळी सर्वेक्षणे समोर आली आहेत. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. एवढेच नाही तर भाजपच्या सर्वेक्षणातही पक्षाचा पराभव होत आहे. हा सर्व्हे आल्यानंतर मध्य प्रदेश भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून भाजपच्या 60 टक्के आमदारांची तिकिटे कापण्यात यावीत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

 आता पर्यंतचे 6 सर्वेक्षण पाहूया…
1. जानेवारी २०२३
संघाचा एक सर्व्हे सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात भाजप 103 जागांसह सरकारमधून बाहेर पडत आहे.

2. फेब्रुवारी २०२३
काँग्रेसचा अधिकृत सर्व्हे समोर आला असून त्यात भाजप ९५ जागांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसत आहे.

3. मार्च २०२३
इंटेलिजन्सचा एक गोपनीय सर्व्हे लीक झाला होता ज्यामध्ये भाजपला 80 पेक्षा कमी जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

4. एप्रिल २०२३
दैनिक भास्कर आणि ईएमएससह अनेक वृत्त गटांचे सर्वेक्षण प्रशासकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, ज्यामध्ये भाजप 70 जागांपर्यंत मर्यादित आहे.

5. मे २०२३
ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्व्हे करण्यात आला होता ज्यामध्ये भाजपला फक्त 65 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

6. जून २०२३
नवभारत समाचारने एक सर्वेक्षण प्रकाशित केले असून त्यात भाजपला केवळ 55 जागांसह सत्तेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले आहे.

वरील सर्व सर्वेक्षणांचे ट्रेंड असे दर्शवत आहेत की, काँग्रेस झपाट्याने पुढे जात आहे आणि लोकांचा आवाज बनत आहे. दुसरीकडे भाजपची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. म्हणजेच यावेळी भाजपच्या जागा 50 पेक्षा कमी होणार हे स्पष्ट आहे, असे काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

First Published on: June 6, 2023 11:06 AM
Exit mobile version