सेल्फीने घेतला तरूणीचा जीव, चार तासांनी सापडला मृतदेह

सेल्फीने घेतला तरूणीचा जीव, चार तासांनी सापडला मृतदेह

सेल्फीने घेतला तरूणीचा जीव, चार तासांनी सापडला मृतदेह

आज काल सेल्फी काढणं हे फॅशन झालं आहे. सेल्फी काढताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. ३० वर्षीय महिला सेल्फी काढताना दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशच्या इंदोर इथल्या एका ठिकाणी आपल्या परिवारासोबत सहलीला गेली होती. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

नीतू महेश्वरी असं या महिलेचं नाव आहे. सहलीवरून परत घरी जात असताना ५५ किलोमीटरवर असलेल्या जाम गेट घाटात ती कुटुंबासोबत थांबली होती. त्याचदरम्यान तिथल्या परिसराचे फोटो काढण्यासाठी महिलेनं फोन बाहेर काढला. सेल्फी घेता घेता महिला खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मृत महिला नीतू महेश्वरी या शहरी भागात राहतात. आपल्या कुटुंबासोबत त्या सहलीला आल्या होत्या. सहलीवरून परत जात असताना त्या जाम गेट घाटात त्या थांबल्या होत्या,अशी माहिती तिथल्या पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोल दरीत कोसळलेल्या महिलेचा शोध घ्यायला सुरूवात केली. तब्बल चार तासांच्या शोधमोहिमे नंतर मृत महिलेला बाहेर काढण्यात आलं. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनेची चौकशी सुरू आहे.


हेही वाचा – ऑडी चालविणाऱ्या मुलीने बाईकस्वाराला दिली धडक; मुलाचा मृतदेह उडाला थेट गच्चीवर

First Published on: November 6, 2020 8:09 PM
Exit mobile version