Live Update: ८ वाजेपर्यंत १२ लाख नागरिकांना कोरोना लसीकरण करून महाराष्ट्राचा नवा विक्रम

Live Update: ८ वाजेपर्यंत १२ लाख नागरिकांना कोरोना लसीकरण करून महाराष्ट्राचा नवा विक्रम

Live update Mumbai Maharashtra

ज्येष्ठ पत्रकार मधू उपासनी यांचे कर्करोगाने दुःखद निधन

ज्येष्ठ आणि ऋषितुल्य पत्रकार, अध्यात्माचे उपासक श्री. मधुकर श्रीधर उपासनी यांचे आज सायंकाळी डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुन नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रेडिएशन, केमोथेरपी उपचार सुरू होते. परंतु उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना चिरंजीव मनीष यांनी घरी आणले. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचे प्राणज्योत मालवली.


रात्री ८ वाजेपर्यंत १२ लाख नागरिकांना कोरोना लसीकरण करून महाराष्ट्राने नवा विक्रम केला असून १२ लाख ६ हजार ३२७ जणांना आज लस देण्यात आली आहे.


संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एका दिवसात ११ लाख ६१ हजार १४१ कोरोना लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले. संपूर्ण दिवसाची संख्या आणखी जास्त असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.


देशात १ कोटीपेक्षा अधिक कोरोना लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत १ कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.


टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये प्रमोद भगतचा ‘गोल्डन पॉईंट’ पॅराबॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवले.


कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला


अरमान कोहली याचा जमीन फेटाळला. अरमान कोहली याला २८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने त्याला जुहू येथून अटक केली होती.


राज्यात येत्या ४८ तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.


पुण्याजवळील कदमवाक वस्ती परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचला बेदम मारहाण


नायर रूग्णालयाच्या शताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमनं

नायर रूग्णालयाच्या शताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना योद्ध्यांचं केलं कौतुक


या रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. कोरोना महामारीदरम्यान, देखील या कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता आपले कार्य बजावले. जिद्द असेल तर काहीही करता येऊ शकतं हे या संस्थेने दाखवले आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं -मुख्यमंत्री


कोरोनादरम्यान, मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. – मुख्यमंत्री


मनसे अध्यक्ष राज ठाकरे  पुणे दौऱ्यावर, राज ठाकरे पुण्यात दाखल


मुंबईतील बोरिवली परिसरात मोठी आग दुर्घटना, गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल


राज्यात ६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा


संजय राऊत यांचे पुण्यात जोरदार स्वागत, संजय राऊत पुणे दौऱ्यावर


शंभू महादेव साखर कारखान्याच्या ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक करण्यात आली आहे, उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई , वैद्यनाथ अर्बन बँकेववर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचं वर्चस्व आहे.


टोकिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला पुन्हा एकदा सुवर्ण आणि रौप्य पदक, नेमबाजीत सिंहराजला सुवर्ण पदक तर मनिष नरवालची रौप्य पदकाला गवसणी


शाळांवर कोणतीही कारवाई करु नका, ठरलेली फी घेण्याचा अधिकार शाळांना, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश, शाळांच्या १५ टक्के फी कपातीच्या निर्णयला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती


पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे ाणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीने दाखल केलेल्या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. मनी लॉड्रींग प्रकरणाचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला.


 

First Published on: September 4, 2021 6:58 PM
Exit mobile version