Live Update: किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल

Live Update: किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल
हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील पुरावे घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कारण अंबाजोगाई न्यायालयाने करुणा शर्मा यांना जामीन अर्ज फेटाळला आहे. करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडी १८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पाहा लालबागच्या राजाची लाईव्ह आरती
करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कारण अंबाजोगाई न्यायालयाने करुणा शर्मा यांना जामीन अर्ज फेटाळला आहे. करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडी १८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अज्ञात कार घुसल्याचे समोर आले आहे. काल, सोमवारी गृहविभागसोबतची बैठक आटोपून परतताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात मर्सिडीज कार घुसली. या बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या मर्सिडीज चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलबार हिल परिसरात राहणारा हा व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे.
थोड्याच वेळात करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सुरुवात होणार आहे. अंबाजोगाईच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार? याचा निर्णय आज लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याप्रकरणी त्यांना अटक करून कोठडीत पाठवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मोदी म्हणाले की, हिंदीला एक सक्षम आणि समर्थ भाषा बनवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी उल्लेखनीय भूमिका निभावली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. हिंदी सतत जागतिक व्यासपीठावर एक मजबूत ओळख निर्माण करत आहे.
देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ४०४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३३९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३७ हजार १२७ जण कोरोनामुक्त झाले आहे. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ३२ लाख ८९ हजार ५७९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ४३ हजार २१३ जणांचा मृत्यू जाला असून ३ कोटी २४ लाख ८४ हजार १५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ६२ हजार २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशभरात आतापर्यंत ७५ कोटी २२ लाख ३८ हजार ३२४ जणांचे लसीकरण पार पडले आहे.
राज्याची वीजबिल थकबाकी ६३ हजार कोटी असल्याचे समोर आले आहे. या वीजबिल थकबाकीबाबत उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊतांसह महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी ११.३० वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन आहे. पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा निरोप देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. घरगुती गणेश विसर्जनाला ५ जणांना उपस्थितीत राहण्याची मुभा असून विसर्जन करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे.
जगभरातील कोरोनाचा कहर अजूनही सुरू आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे काही देशांमध्ये कोरोनाने हाहाकार घातला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत २२ कोटी ६० लाख ५८ हजारांहून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ४६ लाख ५१ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २० कोटी २६ लाख ७६ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ७६व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागाच्या जनरल चर्चेला संबोधित करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
First Published on: September 14, 2021 4:07 PM
Exit mobile version