Live Update: महाराष्ट्रातील आणखी ९ साखर कारखान्यांची ईडीकडून होणार चौकशी

Live Update: महाराष्ट्रातील आणखी ९ साखर कारखान्यांची ईडीकडून होणार चौकशी

Live update Mumbai Maharashtra

महाराष्ट्रातील आणखी ९ साखर कारखान्यांची ईडीकडून होणार चौकशी


अनिल देशमुख्यांच्या घरावर छापेमारी, मुंबई, पुणे, नागपूरातील घरावर छापेमारी


राजकारणात कधीही काही होऊ शकतं, काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी, मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखवली, भाजपा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे- फडणवीस


व्यासपीठावर आजी-माजी एकत्र आले तर ते भावी सहकारी होतील, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने चर्चांना उधाण


खरा विकास तुम्ही पाहिलाच नाही तो आता बघाल, MIMच्या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा टोला, रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी केला आहे. परभणीसाठी भुयारी गटारी योजना, परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा ही जलजीवन अभियाना अंतर्गत करत आहोत. धाराशिवमध्ये भूमिगत गटार योजना सुरु करत आहोत, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन (सविस्तर वाचा) 


सोनू सूदवर आयकराची धाड म्हणजे रडीचा डाव, दिल्ली सरकारचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याने धाड – संजय राऊत


पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्या शुभेच्छा


मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी अनेकांनी हालअपेष्ठा सहन केल्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुख्यमंत्र्यांचा ताफा औरंगाबादमधील कार्यक्रमास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा आज नांदेड दौऱ्यावर, सकाळी ११ वाजता पोहचणार नांदेड विमानतळावर मुदखेडच्या CRPF प्रशिक्षण केंद्रातील CRPF जवानांना करणार संबोधित


मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चंद्रकांत खैरे औरंगाबाद विमानतळावर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल,


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना, याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आणि सिद्धार्थ उद्यानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ उद्यानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त


 

First Published on: September 17, 2021 2:48 AM
Exit mobile version