Live Update: पुण्यात २४ तासांत आढळले ९,८५९ नवे रुग्ण, ११४ जणांचा मृत्यू

Live Update: पुण्यात २४ तासांत आढळले ९,८५९ नवे रुग्ण, ११४ जणांचा मृत्यू
पुण्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ९५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात ८ हजार १७५ रुग्ण बहे होऊन घरी आहेत. त्यामुळे आता पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८५ हजार ९७०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार १०३ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ७६ हजार १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ९८ हजार ८५९ जणांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजार २१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर १० हजार ९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ५३ हजार १५९वर पोहोचली आहे. सध्या ८५ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात गेल्या २४ तासांत ६१ हजार ६९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
MBBS नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे.
गोव्यामध्ये आज दिवसभरात ७५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४ हजार ५७२वर पोहोचली आहे.
पुण्याच्या क्राईम ब्रँच पोलिसांनी रेमडेसिवीरच्या काळाबाजार केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणी जणांना अटक केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बेळगावात पोहोचले आहेत. यावेळी ृहिंडीलगा येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून गेल्या २४ तासात २ लाखाहून अधिक नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ९३ हजारांहून अधिकांनी कोरोनाला हरवले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात १ कोटी ४० लाख ७४ हजारांहून अधिक रूग्ण सक्रीय असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कोरोनी बाधा झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा करोना झाला असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. मी आज कोरोनाची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे, असेही आशिष शेलार यांनी या ट्वीटमध्ये सांगितले आहे.
राज्‍य शासकीय वैदयकिय महाविदयालय आणि रूग्‍णालयातील वैदयकिय अधिका-यांनी आपल्‍या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्‍यास राज्‍यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालयांत १५ एप्रिल रोजी २४ तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्‍याउपरही शासन मागण्या मान्य करणार नसेल तर नाईलाजास्‍तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशारा ‘वैदयकिय महाविदयालय वैदयकिय अधिकारी संघटना महाराष्‍ट्रने’ दिला आहे.
First Published on: April 15, 2021 11:19 PM
Exit mobile version