Live Update: पश्चिम बंगालमध्ये आता भाजप यापुढे कोणत्याही मोठ्या सभा करणार नाही

Live Update: पश्चिम बंगालमध्ये आता भाजप यापुढे कोणत्याही मोठ्या सभा करणार नाही
राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपनेही मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये आता भाजप यापुढे कोणत्याही मोठ्या सभा करणार नाही. खुल्या मैदानात ५०० नागरिकांच्या उपस्थिती सभा होणार.
काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात गेल्या २४ तासांत ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ लाख ९८ हजार २६२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६० हजार ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे.
मुंबई गेल्या २३ तासांत ७ हजार ३८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५७ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ८ हजार ५८३ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८६ हजार ६९२वर पोहोचली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण
डोंबिवलीमधील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी कोरोनाची लागण
उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. राम नाईक यांनी घरीच विलगीकरण केले आहे. थोडा ताप आल्यानंतर लागलीच चाचणी केल्यावर कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. मालाड येथील संजीवनी रुग्णालयाचे डॉ. सुनिल अग्रवाल व डॉ. राजेश बिनयाला यांच्या देखरेखीखाली राम नाईक यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची तब्येत सुधारते आहे.
जनता दल युनायटेडचे आमदार आणि बिहारचे माजी शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी यांचं सोमवारी निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. चौधरी गेल्या काही दिवसांअगोदर करोना संक्रमित आढलळे होते. तेव्हापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. पाटण्याच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
औरंगाबादेत ३० एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या ४५ वर्षावरील नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी लस न घेता दुकाने उघडण्याची परवानगी नसणार असून विना लस व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यास मनाई असणार आहे. यासह विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी १२ पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत.
देशात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासात २ लाख ७३ हजार ८१० नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ६१९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. दिलासादायक म्हणजे दिवसभरात १ लाख ४४ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आणि पटकथालेखक, ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. देवराई, दोघी, दहावी फ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांची ओळख होती. दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता, बाधा, नितळ, घो मला असला हवा, कासव, अस्तु असे अनेक मराठी चित्रपट व हिंदी लघुपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी बारामतीत जेरबंद करण्यात आली आहे. या चौघांना अटक करून ताब्यात घेतले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीत पॅरासिटामोलचं औषध भरत असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्यामध्ये रविवारी तब्बल ५०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. यामध्ये अहमदनगरमध्ये सर्वाधिक ८८ जणांचा तर मुंबईमध्ये ५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यामध्ये रविवारी ६८,६३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधितांची संख्या ३८,३९,३३८ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,७०,३८८ इतकी आहे. रविवारी ४५,६५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर राज्यात आजपर्यंत ३१,०६,८२८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून सांगलीत राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सेवासदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.  
First Published on: April 19, 2021 9:18 PM
Exit mobile version