ऑनलाईन गेम खेळताना झालं प्रेम, पण वय नडलं आणि लग्न अडलं

ऑनलाईन गेम खेळताना झालं प्रेम, पण वय नडलं आणि लग्न अडलं

ऑनलाईन गेम खेळताना झालं प्रेम, पण वय नडलं आणि लग्न अडलं

आजकाल ऑनलाईन प्रेमाचा ट्रेंड सुरू आहे. अशाच एका प्रेमाची सध्या चर्चा पुण्यात सुरू आहे. चक्क ऑनलाईन गेम (Online Games) खेळताना तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. महाराष्ट्रीय (Maharashtra) मुलगा आणि हरियाणी ( Hariyana) मुलगी यांची ही प्यार वाली लव्ह स्टोरी पूर्ण करण्यासाठी त्यांना थेट कोर्टात धाव घ्यावी लागली आहे. ऑनलाईन गेम खेळताना दोघांची मैत्री झाली त्यानंतर व्हॉट्स अँपवर चॅटींग करत एकमेकांना कधीही न पाहिलेले दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे जे झाल त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रेम सिद्ध करण्यासाठी कोर्टाची मदत करावी लागले त्यांना देखील वाटले नव्हते.

महाराष्ट्रीय मुलगा आणि हरियाणी मुलगी यांची लव्ह स्टोरी सुरू झाली कोरोना काळात. महाराष्ट्राच्या बारामती (Baramati) जिल्ह्यातील भिगवन गावातील मुलाची हरियाणाच्या भवानी जिल्ह्यातील दादरी तालुक्यात राहणाऱ्या मुलीशी ऑनलाईन गेम खेळताना मैत्री झाली. व्हॉट्स अँपवर चॅटिंग करताना दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी एकमेकांना जीवनसाथी मानत लग्न करायचे ठरवले. दरम्यान मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले. मात्र मुलीचा लग्नाला विरोध होता म्हणून तिने पळून जायचे ठरवले. मुलगी हजारो किमी पार करुन पुण्यातील दौंड रेल्वे स्टेशनवर आली. ट्रेनने पुण्यात येई पर्यंत दोघांचे फोनवर बोलणे सुरू होते. मात्र मुलगी दौंड रेल्वे स्थानकात पोहताच मुलीच्या मामाने मुलीला ताब्यात घेऊन घरी नेले.

मुलगी हरियाणाहून पळून गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. हरियाणा पोलिसांनी मुलगी महाराष्ट्रातील भिगवण येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हरियाणा पोलीस मुलीच्या कुटुंबियांना घेऊन भिगवन येथे पोहचली. भिगवन पोलिसांनी मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबियांना समोरा समोर बसवले. त्यांची मिटींग घेतली परंतु मुलीच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिला आणि ते मुलीला तिथेच सोडून हरियाणाला परत गेले.

हरियाणाहून पळून आलेल्या मुलीचे वय हे केवळ २१ वर्ष आणि मुलाचे वय १९ वर्ष. लग्न करण्यासाठी मुलाचे वय २१ वर्ष आणि मुलीचे वय १८ पूर्ण असणे गरजेचे आहे मात्र या प्रकरणात सर्व उलट आहेय. मुलगा मुलगी लग्नाला तयार असले तरी त्यांच्या वयामुळे कायद्याने त्यांचे लग्न रखडले आहे.


हेही वाचा – हेअरबँडमधून सोन्याची तस्करी, मंगळुरु विमानतळावर एकाला अटक

First Published on: August 27, 2021 4:23 PM
Exit mobile version