APP आणि इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट ; फॉलो करा ‘या’ 5 स्टेप्स

APP आणि इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट ; फॉलो करा ‘या’ 5 स्टेप्स

आता तुम्ही बोलून देखील UPI पेमेंट करू शकणार आहात. आता केवळ, फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत.

साधारणत: UPI पेमेंट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आणि स्मार्टफोनची गरज असते. इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करण्यासाठी तुम्हाला Paytm,Google Pay,Bharatpe,Amazon pay,phonepe कींवा Airtel Payments Bank सारख्या अॅपची सुद्धा गरज भासणार आहे. हे पेमेंट करण्यासाठी तुम्ही फोनच्या बेसिक फीचरचा वापर करु शकता. त्यासाठी जाणून घ्या 5 स्टेप्स जेणेकरुन इंटरनेट आणि अॅपशिवाय तुम्ही यूपीआय पेमेंट करु शकता.

जे लोक स्मार्टफोन वापरत नाहीत आणि ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन नाही. अशा लोकांनी बेसिक फोनमधून *99# डायल करुन यूपीआय पेमेंट करु शकता. यासाठी फक्त तुम्हाला एकदा भीम अॅपवर तुमचे अकाउंट करावे लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा योग्य तो नंबर बॅंक खात्याशी लिंक करावा लागणार आहे. देशातील सर्व मोबाईल कंपन्या या ग्राहकांना आपल्या नेटवर्कवर *99# ची सर्व्हिस देते,कारण ही एक यूएसएसडी सर्व्हिस आहे.

आता तुम्हाला UPI द्वारे पैसे पाठवायचे असतील तर Send Money चा नंबर डायल करा. यामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्याच्या मोडबद्दल विचारले जाईल, ज्यामध्ये डायरेक्ट अकाउंट, फोन नंबर किंवा UPI चा पर्याय दाखवला जाईल. तुम्ही UPI द्वारे पैसे पाठवण्याचे निवडल्यास, तुम्हाला लाभार्थीचा UPI आयडी प्रदान करावा लागेल. यानंतर समोरच्या व्यक्तीला जेवढे पैसे पाठवायचे आहेत तेवढे टाकावे लागतील.

पैसे भरल्यानंतर, तुम्हांला युपीआय पेमेंटप्रमाणे शेवटी आपला पिन टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला Send चा पर्याय निवडून पैसे पाठवावे लागतील. अशा प्रकारे इंटरनेटशिवाय तुम्ही UPI द्वारे कोणालाही पैसे पाठवू शकता. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज देखील मिळेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 50 पैसे शुल्क भरावे लागेल.


हेही वाचा – Corona variant : ओमिक्रॉननंतरचा नवा व्हेरिएंट ठरणार प्राणघातक ; तज्ज्ञांचा दावा


 

First Published on: January 8, 2022 10:55 AM
Exit mobile version