पत्नीला पोटगी द्यावी लागू नये, म्हणून ‘या’ व्यक्तीने काय केले बघा?

पत्नीला पोटगी द्यावी लागू नये, म्हणून ‘या’ व्यक्तीने काय केले बघा?

कॅनडातील उद्योगपती

बऱ्याचदा वैवाहिक जीवनात पटले नाही का शेवटी निर्णय घेतला जातो, तो म्हणजे घटस्फोट. आणि ज्यावेळी घटस्फोटाची वेळ येते त्यावेळी खरे रुप त्या व्यक्तीचे समोर येते. जे आधी आपले असते ते नंतर तुझ आणि माझ होऊ लागते. दरम्यान, अनेक महागड्या घटस्फोटांची नेहमीच आपण चर्चा देखील ऐकतो. विशेष म्हणजे amazonच्या मालकाचा आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. कारण त्यांनी आपल्या पत्नीला पोटगी म्हणून कोटी रुपये देऊ केले होते. पण, कॅनडात एक असाच प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे एका उद्योपतीला पोटगी द्यावी लागू नये, म्हणून त्यांने एक अजब असा प्रकार केला आहे.

काय केले या उद्योगपतीने?

कॅनडातील Bruce McConville असे या उद्योगपतीचे नाव आहे. या उद्योगपतीचे आपल्या पत्नीसोबत पटत नसल्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेगळे राहिल्यास त्यांना आपल्या पत्नीला कायद्याने पोटगी देणे बंधनकारक होते. मात्र, हे टाळण्यासाठी त्याने चक्क १ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय करन्सीनुसार ५ कोटी रुपयाला चक्क आग लावून दिली.

असे जमा केले होते पैसे

ब्रूस यांने त्यांच्या सर्वच बँक अकाऊंट्समधून पैसे काढले आणि त्यांना आग लावली. त्यांनी याबाबत सांगितले की, त्यांचे एकूण पाच बँक अकाऊंट होते. ज्यामधून १ मिनियन डॉलर काढले आणि त्या पैशांना आग लावली. ब्रूसच्या सांगण्यावर सर्वप्रथम कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र, त्यांनी बँकेतून पैसे काढलेल्याच्या सर्व पावत्या दाखवल्या. तसेच त्यांनी सांगितले की, ‘हे पैसे त्याची प्रॉपर्टी विकून जमा केले होते.’

३० दिवसांचा तुरुंगवास

ब्रूसने केलेल्या कृत्याला कोर्टाने व्यक्तीगतच नाही तर सार्वजनिक दृष्टीनेही जबाबदार ठरवले आहे. त्यानुसार या कारनाम्यासाठी कोर्टाने उद्योगपतीला ३० दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सोबतच २ हजार कॅनेडियन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


हेही वाचा – स्वित्झर्लंड सर्वांत महाग तर भारत-पाकिस्तान स्वस्त


 

First Published on: February 7, 2020 5:35 PM
Exit mobile version