घरताज्या घडामोडीस्वित्झर्लंड सर्वांत महाग तर भारत-पाकिस्तान स्वस्त

स्वित्झर्लंड सर्वांत महाग तर भारत-पाकिस्तान स्वस्त

Subscribe

जगातील सर्वात स्वस्त देश म्हणून पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे अफगाणिस्तान आणि भारत आहे.

युरोपमधील स्वित्झर्लंड हा जगातील सर्वांत महाग देश ठरला आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे नॉर्वे आणि आइसलँड हे देश आहेत. ८६ लाख लोकसंख्या असेलेला स्वित्झर्लंड निसर्गसौंदर्यासाठी खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे तिथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. तसंच तो पर्यटकांचा आवडता देश आहे. तर पाकिस्तान हा देश सर्वांत स्वस्त देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर पाकिस्तानच्या पाठोपाठ अफगाणिस्तान आणि भारताचा नंबर आहे. जगातील १३२ देशांची पाहणी करून अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्राला वाहिलेले मासिक ‘सीईओ वर्ल्ड’ने ही क्रमावारी जारी केली आहे.

देशांतील घरांचे भाडे, किराणा माल आणि हॉटेलमधील पदार्थांच्या किंमती यांचा पाहणीसाठी विचार केला जातो. तसेच कपडे, टॅक्सीचे भाडे, इंटरनेटचे शुल्क यांचाही विचार केला जातो. यामध्ये प्रत्येक देशाच्या राजधानीचे देखील सर्वेक्षण केले जाते. जगात सातत्याने वर जाणाऱ्या औद्योगिक निर्देशांकाचा आढावा घेणे हा या पाहणीचा उद्देश असतो. राजधानीतील प्रसिद्ध हॉटेल आणि उच्चवर्गीयांच्या गृहकुल संकुलांची पाहणी केली जाते. या सर्व निकषांवरून ‘सीईओ वर्ल्ड’ क्रमावारी ठरवते. स्वित्झर्लंडला यामध्ये १२२ गुणांक आहेत. तर पाकिस्तानला २१.९८ आणि भारतला २४.५८ गुणांक आहेत.

- Advertisement -

जगातील सर्वात १० महाग देश आणि त्यांचे गुणांक
१) स्वित्झर्लंड – १२२
२) नॉर्वे – १०१
३) आइसलँड – १००
४) जपान – ८३
५) डेन्मार्क – ८३
६) बहमास – ८२
७) लग्झेंमबर्ग – ८१
८) इस्त्राईल – ८१
९) सिंगापूर – ८१
१०) दक्षिण कोरिया – ७८

जगातील सर्वात १० स्वस्त देश
१) पाकिस्तान – २१
२) अफगाणिस्तान – २४
३) भारत – २४
४) सिरीया – २५
५) उझबेकिस्तान – २६
६) किरगिझस्तान – २६
७) ट्युनेशिया – २७
८) व्हेनेझुएला – २७
९) कोसोवो – २८
१०) जॉर्जिया – २८

- Advertisement -

हेही वाचा – भारतातल्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेला चिंता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -