मित्र बनला शत्रू! उडवले मित्राचेच मुंडके

मित्र बनला शत्रू! उडवले मित्राचेच मुंडके

क्रूरकर्मा आरोपी पशुपती

कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यामध्ये ‘मैत्री’च्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. शनिवारी मांड्या जिल्ह्यात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने त्याच्याच जिवलग मित्राचं मुंडकं कापलं. त्यानंतर मित्राचं मुंडक तसंच हातात घेऊन तो पोलीस स्ठानकामध्ये गेला आणि गुन्हा मान्य करत स्वत:ला पोलिसांच्य स्वाधीन केले. आरोपीने अशाप्रकारे केलेलं आत्मसमर्पण पाहून पोलीसही काही काळासाठी थक्क झाले. उपलब्ध माहितीनुसार, पशुपती असं या २८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. पशुपतीने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, आपल्या आईबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद उद्गार काढल्यामुळे त्याने मित्राची हत्या करुन त्याचे डोके धडापासून वेगळे केले. पशुपती आणि त्याचा जवळचा मित्र गिरीश हे दोघेही मंड्यातील चिक्काबगीलू या गावात राहात होते. दरम्यान पशुपतीच्या विकृत आणि विक्षिप्त कृत्यामुळे त्या परिसरातील स्थानिक लोक हैराण झाल्याची माहिती मिळते आहे.


वाचा : BKC मध्ये अजगरांचा सुळसुळाट, २० अजगर ताब्यात

स्थानिक पोलिसांनी सांगितल्यानुसार, ‘शनिवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आरोपी पशुपती पोलीस स्थानकात आला. त्यावेळी त्याचे कपडे रक्ताने माखले होते तसंच त्याच्या गिरीशचे शीर होते. गिरीशने सगळ्या घटनेचं सविस्तर कथन करत त्याचा गुन्हा कबुल केला आणि स्वत:ला आमच्या हवाली केले.’ हत्येमध्ये वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करुन पोलिसांनी पशुपतीला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच महिन्यात कर्नाटकमध्ये असेच आणखी २ विक्षिप्त प्रकार घडले आहेत. २७ सप्टेंबर रोजी अजिज खान नावचा तरुण प्रेयसीने विश्वासघात केल्यामुळे तिचे कापलेले शीर घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. तर त्याआधी ९ सप्टेंबर रोजी सतिश नामक इसमाने आपल्या पत्नीचे कापलेले शीर घेऊन चिकमंगळुरु पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. सतीशने त्यावेळी आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली दिली होती.
First Published on: September 30, 2018 3:08 PM
Exit mobile version