चित्रपट पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू

चित्रपट पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू

'जानू' चित्रपट

चित्रपट पाहण्यास गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. समंथा अक्किनेनी आणि शादवानंद स्टारर तेलगु ‘जानू’ चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून या चित्रपटला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ‘जानू’ हा चित्रपट पाहताना एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती ‘जानू’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट संपल्यानंतर सर्व लोक सिनेमागृहाच्या बाहेर पडले. मात्र, एक व्यक्ती खुर्चीवरुन उठली नव्हती. सिनेमागृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या व्यक्तीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ही व्यक्ती जिवत नसल्याचे समजले. तसेच या व्यक्तीला सिनेमा पाहतानाच हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच त्या व्यक्तीजवळ कोणतेही ओळखपत्र मिळाले नसून पोलीस त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या मते, व्यक्तिचाा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने किंवा कार्डियाक अरेस्टने झाला असावा अंदाज आहे.

जानू चित्रपटाविषयी…

जानू हा तमिळ सुपरहिट सिनेमा ९६ चा रिमेक आहे. तसेच या सिनेमाचे दिग्दर्शन प्रेम कुमार यांनी केले असून दिल राजू यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तमिळ सिनेमात विजय सेतुपती आणि तृषा कृष्णन यांची मुख्य भूमिका होती.


हेही वाचा – पुरुषांनो सांभाळा, ‘सेक्स हार्मोन्स’मुळे करोनाचा तुमच्यावर डोळा


First Published on: February 9, 2020 2:31 PM
Exit mobile version