तिरडीवरुन उठला आणि चक्क मागितलं पाणी!

तिरडीवरुन उठला आणि चक्क मागितलं पाणी!

तिरडीवरुन उठला आणि चक्क मागितलं पाणी!

अनेकदा एखाद्याच्या जवळची व्यक्ती कायमची निघून गेली की, ती व्यक्ती पुन्हा जीवंत व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, एकदा डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ती व्यक्ती जीवंत होणे शक्य नसते. परंतु, उत्तर प्रदेशात अशी धक्कादायक समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयाने २८ वर्षीय तरुणाला मृत घोषित केले होते. त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरी नेण्यात आले. चार तासांनंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी शोकाकुल वातावरण असताना अचानक मृत तरुणाने डोळे उघडले आणि त्याने इशाऱ्याने पाणी मागितले. त्यानंतर तो तरुण पाणीदेखील प्यायला आणि सगळ्यांना धक्काच बसला.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशमध्ये अमिनाबादचे रहिवासी असलेल्या गुरु प्रसाद यांचा मुलगा संजय (२८) ची प्रकृत्ती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्या तरुणाला कावीळ झाल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर चार ते पाच दिवस उपचार केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याच्यावर पुढील उपचार करण्यासाठी त्याला शनिवारी नक्खासमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या तरुणाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी देखील त्याला मृत घोषित केले. त्यानंतर आम्ही त्याचा मृतदेह घेऊन घरी आलो‘, असे त्याच्या मावशीच्या मुलीने सांगितले.

रविवारी या तरुणावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. एका बाजूला या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु होती. दरम्यान, त्या तरुणाने शरीराची हालचाल केली आणि अचानक डोळे उघडले. तसेच डोळे उघडून तरुणाने पाण्यासाठी इशारा केला आणि एक कप पाणीदेखील प्यायला. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी बलरामपूरमधील रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्या तरुणाला मृत घोषित केले.


हेही वाचा – डोंबिवलीत तिरडीच्या चटईत गोलमाल?; 


 

First Published on: July 15, 2019 5:46 PM
Exit mobile version