न्हाव्याने ड्रीम इलेव्हनवर बनवली स्वतःची क्रिकेट टीम, रातोरात झाला करोडपती

न्हाव्याने ड्रीम इलेव्हनवर बनवली स्वतःची क्रिकेट टीम, रातोरात झाला करोडपती

न्हाव्याने ड्रीम इलेव्हनवर बनवली स्वतःची क्रिकेट टीम, रातोरात झाला करोडपती

मोबाईल अॅपच्या माध्यमातून ड्रीम इलेव्हन तयार करून आयपीएल स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकण्याच्या टीव्हीवर जाहिराती येत असतात. पण याच प्रसिद्धीमुळे अरबिया संग्रामचा राहणारा अशोक करोडपती झालायं. त्याचे मधुबनीच्या अंधारथाडी ब्लॉकमधील नानूर चौकात न्हावी असून त्याचे दुकान असून तो ते चालवत होता. मात्र अचानक त्याचं नशीबच पालटलं. कारण तो एका झटक्यात करोडपती बनवल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सध्या मधुबनीमध्ये त्याचीच चर्चा होताना दिसत आहे.

अशोकला हा जॅकपॉट रविवारी लागला. त्याने चेन्नई विरुद्ध कोलकाताच्या आयपीएल सामन्यात पन्नास रुपये गुंतवून त्याच रात्री ड्रीम इलेव्हनमध्ये त्याने स्वतःचा असा संघ बनवला. त्याला कोणत्याही सद्याबद्दल माहिती नसताना त्याने तयार केलेल्या संघाने उत्तम कामगिरी केली. अशोकने बनवलेल्या ड्रीम इलेव्हनच्या सर्व खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आणि लॉटरी पार पडली. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, मधुबनीच्या अशोकला यासाठी अधिकृत कॉलही आला आहे. त्याला आयपीएलमधून त्या एक मॅसेज आला. यामध्ये ३० टक्के रक्कम कापून त्याला ७० लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले जातंय. एका गरीब कुटुंबातून आलेल्या अशोकने स्वप्नातही याची अपेक्षा केली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक ठाकूर, मूळचा मधुबनीतील झंझारपूरच्या अररिया संग्राम परिसरातील, अतिशय गरीब कुटुंबातून येतो. येथील नानौर चौकात एक लहान न्हाव्याचं दुकान चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अशोकने असे सांगितले की, जेव्हा त्याला कळले की त्याची लॉटरी जिंकली आहे, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. यानंतर अशोकने सांगितले की, या लॉटरीच्या पैशाने तो त्याचा कर्ज फेडणार असून स्वप्नातील घर बांधण्याची इच्छा आहे.


 

First Published on: September 28, 2021 3:55 PM
Exit mobile version