सापाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याला तोच साप डसला

सापाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याला तोच साप डसला

प्रातिनिधिक फोटो

विषारी साप चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. एका हॉटेलच्या रूममध्ये या तरुणाला साप डसल्यामुळे हा प्रकार घडला होता. दक्षिण चीनच्या जियांग्झी प्रांतातील फुझहौ या हॉटेलमध्ये ही घटना घडली. या खोलीत तीन साप आढळल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. हॉटेलच्या सीसीटीवीमध्ये हे साप हॉटेलमध्ये फिरत असल्याचे कैद झाले आहे. या घटनेनंतर हॉटेलमधील ग्राहकांमध्ये भिती निर्माण झाली होती. अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी साप पकडल्यानंतर एका महिलेनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.

काय आहे प्रकार

जियांग्झी येथील अग्नीशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार येथील एका हॉटेलमध्ये साप आढळून आले होते. अग्नीशमन अधिकारी या हॉटेलमध्ये प्रवेश केला असता त्यांना हॉटेलच्या एका रूममधील बाथटबमध्ये मृतदेह आढळला. अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलमधील साप पकडले आणि मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिलेने केलेले आरोप

घटनास्थळावर असलेल्या एका महिलेनी या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. मयत मुलगा हा सर्पमित्र असून तो मागील अनेक वर्षांपासून सापांना पकडतो. या तरुणाकडेच हे तिन साप असल्याचे महिलेनी सांगितले. विषारी सापांना पाळून त्यांचा धाक दाखवून हा तरुण महिलांवर बलात्कार करत असल्याचा आरोप तिने केला. रूममधील बाथटबमध्ये सापाचा धाक दाखवून हा तरुण बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी हातात पकडलेला साप हा चुकून त्यालाच चावला व रूम बाहेर पडला. या सापाव्यतिरिक्त तरुणाकडे अजून दोन साप होते. हे साप रूममधील गादीवर आढळले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी घटनेची नोंद केली असून पुढील कारवाई सुरु केली आहे.

First Published on: November 30, 2018 11:40 AM
Exit mobile version