आत्महत्येसाठी तरुणाने मारली मेट्रोच्या ट्रॅकवर उडी

आत्महत्येसाठी तरुणाने मारली मेट्रोच्या ट्रॅकवर उडी

प्रातिनिधिक फोटो

दिल्ली मेट्रोच्या ट्र्रॅकवर उडीघेत एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही काळ दिल्ली मेट्रो बंद ठेवण्यात आली होती. राजीव चौक ते नोएडा सीटी सेंटर दरम्यान ही घटना घडली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून मयत इसम या ठिकाणी कसा  पोहोचला याची चौकशी सुरु केली आहे. दरम्ययान या घटनेनंतर मेट्रो सेवा काही वेळेसाठी बंद ठेवण्यात आली होती. याची गैरसोय लाखो प्रवाशांना झाला.

कशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत इसम ४५ वर्षीय होता. आज सकाळी हा इसम दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर प्रवासासाठी आला होता. अचानक या इसमाने मेट्रो येते वेळी ट्रॅकवर उडी मारली. या घटनेत हा इसम जखमी झाला. मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला लेडी हार्डिंग रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अद्याप अत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मयत माणसाच्या घरच्यांचा शोध घेऊन पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

First Published on: January 15, 2019 3:06 PM
Exit mobile version