petrol diesel price hike : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात अनोखे आंदोलन; वऱ्हाडी सायकलवरून पोहोचले लग्नाला

petrol diesel price hike : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात अनोखे आंदोलन; वऱ्हाडी सायकलवरून पोहोचले लग्नाला

६३ वेळा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीोpetrol diesel price hike : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात अनोखा निषेध; वऱ्हाडी सायकलवरून पोहोचले लग्नाला

देशातील वाढत्या इंधनाच्या किमतींचा जाहीर निषेध करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या लग्न समारंभाच्या ठिकाणी एक अनोखं आंदोलन केले आहे. या लग्नात स्वत: वर लग्न समारंभाच्या ठिकाणी सायलकवरून पोहचला, विशेष बाब म्हणजे या वराचे संपूर्ण नातेवाईक, कुटुंबिय आणि मित्रपरिवार हे लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी पायी चालत पोहचले.

या वरातीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी हे आदर्श लग्न असल्याचे म्हणत कौतुक केलं आहे. वर शुभ्रांशू सामल यांने सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने ‘धडाकेबाज’ मिरवणुकीची व्यवस्था केली होती. पण देशातील वाढत्या इंधनाच्या किमतींविरोधात माझा निषेध नोंदवण्यासाठी मी लग्नाच्या मंडपात पोहोचण्यासाठी सायकल वापरण्याचा निर्णय घेतला.

लग्नाचे कपडे परिधान करून त्यांने सुमारे एक किलोमीटरचे अंतर सायकलवरून कापले. यावर सामल म्हणाले की, त्यांच्या या अनोख्या निषेधाला मिळालेल्या प्रचंड जनसमर्थ्याने मला आश्चर्य वाटते. मिरवणुकीत सामील असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “तिथं उभ्या असलेल्या लोकांनी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही सायकल चालवणाऱ्या सुभ्रांशुसोबत सेल्फी काढले.”

याव सामल म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्यांच्यासारखे आणखी बरेच लोक निराश झाले आहेत. राजभवनाजवळ आंदोलन करणे ही राजकीय पक्षांची नेहमीची गोष्ट झाली आहे. एक व्यक्ती म्हणून मला माझी नाराजी दाखवायची होती. इंधन दरवाढीबाबत जनतेचा संताप सत्तेत असलेल्यांनी जाणून घ्यावा. दरम्यान गुरुवारी भुवनेश्वरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 112.56 रुपये आणि डिझेलची किंमत 102.24 रुपये होती.


CBI Raid : लालू प्रसाद यादव यांच्या घरासह 17 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी, तपास मोहीम अद्याप सुरूच

First Published on: May 20, 2022 11:06 AM
Exit mobile version