स्वयंघोषित ज्योतिषाने दिलेली मृत्युची तारीख हुकली; तब्बल १४ वर्षांनी झाले निधन

स्वयंघोषित ज्योतिषाने दिलेली मृत्युची तारीख हुकली; तब्बल १४ वर्षांनी झाले निधन

कुंजीलाल मालवीय

भोपाळमधील बेतूल जिल्ह्यातील, सेहरा गावात राहणारे ८८ वर्षीय कुंजीलाल मालवीया यांनी तब्बल १४ वर्षांपूर्वी म्हणजेच, २० ऑक्टोबर २००५ रोजी त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर अनेक पत्रकार, वृत्तवाहिन्यांनी सेहरा गावात जाऊन त्याची दखलही घेतली होती. त्यावेळी ही बातमी चांगलीच चर्चेत राहिली होती. २००५ साली मरणार असल्याची भविष्यवाणी कुंजीलाल यांनी केली असली तरी त्यांच्या नशीबात मात्र काही वेगळेच होते. मृत्युच्या भविष्यावाणीनंतर ते पुढे तब्बल १४ वर्ष जगले. कुंजीलाल हे सेहरा गावातील स्वयंघोषित ज्योतिषी म्हणून ओळखले जात असून ‘चौसर’ म्हणजे ठोकल्याच्या साहाय्याने ते लोकांची भविष्य सांगत असे.

जेव्हा त्यांनी २००५ मध्ये त्यांच्या मरणाबाबतची भविष्यवाणी केली तेव्हा प्रथम डॉक्टर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सेहरा गावी धाव घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मीडिया तेथे जमा झाली. गावाला जणू जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
– रामप्रसाद बिलोरे, कुंजीलालचे शेजारी

गेल्या आठवड्यातील शुक्रवारी, २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कुंजीलाल यांचे निधन झाले. गावकऱ्यांचे म्हणने आहे की, आजवर त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहे. अनेक मोठी माणसं त्यांच्याकडे भविष्यवाणी जाणून घेण्याकरता येत असतं. बिलोरे यांनी पुढे सांगितले की, कुंजीलाल यांच्या निधनाच्या एक आठवड्यापूर्वी ते त्यांना भेटले होते आणि आता माझा अंत जवळ आला आहे, असेही ते म्हणाले होते. २००५ मधील भविष्यवाणीनंतर कुंजीलाल यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या आणि त्यामुळे ते जीवंत राहिले, असे कुंजीलाल सांगायचे.

२०१० मध्ये आमिर खानने निर्मिती केलेल्या “पीपली लाईव्ह” या चित्रपटातील कमाईचा वाटा कुंजीलाल यांनी मागितला होता. त्यातील एक पात्र त्यांच्या आयुष्यावर आधारीत असल्याचा दावा कुंजीलाल यांनी केला होता. कुंजीलाल एक शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली नसली तरीही त्यांना या वक्तव्यामुळे अपार प्रसिद्धी मिळाली एवढं मात्र खरं.

हेही वाचा: ISISचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी कसा मेला ते कळणार!

First Published on: October 29, 2019 5:35 PM
Exit mobile version