घरदेश-विदेशISISचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी कसा मेला ते कळणार!

ISISचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी कसा मेला ते कळणार!

Subscribe

रविवारी अबु बक्र अल बगदादीचा खात्मा झाल्यानंतर या कारवाईचा व्हिडिओ जारी करण्यात येणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

अमेरिकन फौजांनी सिरियामध्ये केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईमध्ये जगातला मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बक्र अल बगदादी मारला गेल्याचं वृत्त खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर साऱ्या जगातून सुटकेचा नि:श्वास टाकला गेला होता. आता ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर त्या कारवाईचा जसा व्हिडिओ जारी करण्यात आला होता, तसाच व्हिडिओ आता बगदादीवरच्या कारवाईचा जारी होणार आहे. त्यामुळे नक्की बगदादीचा शेवट कसा झाला, त्याचा खुलासा जगासमोर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच संकेत दिले आहेत.

एडिट करून फूटेज जाहीर करणार

सिरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद यांच्या परवानगीनेच अमेरिकन फौजा बगदादीचा खात्मा करण्यासाठी सिरियामध्ये घुसल्या होत्या. बगदादी असलेल्या तळावर हवाई हल्ला, तसेच अमेरिकी तुकडीने जमिनीवरून केलेली कारवाई यातून बगदादी आणि त्याच्या हस्तकांचा तळ उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेकडे असलेल्या व्हिडिओ फूटेजमध्ये सैनिकांच्या डोक्यावर लावण्यात आलेले गोप्रो कॅमेरे आणि बगदादीच्या तळावरचं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून काढलेलं शूटिंग असणार आहे. यातल्या फूटेजची तपासणी करूनच त्यातला काही भाग जाहीर करण्यात येणार आहे. अमेरिकी सैनिकांनी केलेली कारवाई किंवा त्यांची योजना कुठेही बाहेर येणार नाही, अशा पद्धतीने हे व्हिडिओ फूटेज एडिट करून जाहीर केलं जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इसिसचा म्होरक्या बगदादी भूसुरुंग स्फोटात ठार

लढाई अद्याप संपलेली नाही!

डोनाल्ट ट्रम्प यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तसे संकेत दिले आहेत. ‘सिरियातल्या कारवाईचं फूटेज जाहीर करण्यासंदर्भात आम्ही नक्कीच विचार करत आहोत. त्यातला काही भाग आम्ही जाहीर करू शकतो’, असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. रविवारी ट्रम्प यांनीच अमेरिकी कारवाईमध्ये अबू बक्र अल बगदादी मारला गेल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, बगदादी जरी मारला गेला असला, तरी दहशतवादविरोधातील लढा अद्याप संपलेला नसल्याची प्रतिक्रिया जागतिक पटलावर उमटत आहे.

सापडलेले डीएनए बगदादीचेच

अमेरिकी सैनिक तळाजवळ पोहोचल्यानंतर आपण त्यांच्या हाती लागू नये, म्हणून बगदादीने स्फोट घडवून स्वत: आत्महत्या केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. घटनास्थळावरच्या डीएनएची तपासणी केल्यानंतर ते बगदादीचेच असल्याचं देखील सिद्ध झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -