मनमोहनसिंग यांची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह

मनमोहनसिंग यांची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग यांची आता प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती नवभारत टाइम्सने दिली आहे. त्यांना देण्यात आलेल्या नव्या औषधांची reaction झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

नेमके काय झाले?

मनमोहनसिंग यांना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटत होते आणि छातीत देखील दुखत होते. त्यामुळे त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयाच्या कार्डिओथोरॅसिक विभागात दाखल करण्यात आले होते. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन औषधांच्या reactionमुळे त्यांना ताप आला होता. त्यामुळे त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांना कार्डिओथोरॅसिक विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम मनमोहनसिंग यांची देखभाल करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. २००९ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर एम्समध्येच कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

एक – दोन दिवसात घरी सोडणार

मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहनसिंग यांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच त्यांना कालपासून पुन्हा ताप आलेला नाही. तसेच त्यांच्या काही इतर तपासण्या करण्यात आल्या आहेत. ते अहवाल येणे बाकी आहे. ते अहवाल आल्यानंतर त्यांना येत्या एक ते दोन दिवसात घरी सोडले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – ५० दिवसांनंतर आज मुंबईतून धावणार पहिली प्रवाशी ट्रेन


 

First Published on: May 12, 2020 8:56 AM
Exit mobile version