Mann Ki Baat: जल संवर्धनाचा संदेश देत मोदी म्हणाले, ‘परिसापेक्षा महत्त्वपूर्ण पाणी’

Mann Ki Baat: जल संवर्धनाचा संदेश देत मोदी म्हणाले, ‘परिसापेक्षा महत्त्वपूर्ण पाणी’

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा आज ८२ वा एपिसोड, सण उत्सवांबद्दल काय सांगणार?

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज २८ फेब्रुवारी रोजी देखील ते ‘मन की बात’ द्वारे देशवासियांशी संवाद साधत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात जलसंवर्धनाचा मौल्यवान संदेश दिला आहे. माघ महिन्यापासून त्यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यांनी असे सांगितले, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे पाण्याची बचत करून पाणी वाचवण्याची ही योग्य वेळ आहे. “पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे, इतकेच नाही तर परिसापेक्षा पाणी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. आपण आत्ताच पाण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत, २२ मार्च रोजी जागतिक जलदिन देखील आहे. यापार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्यासाठी अभियान देखील सुरू केले जातेय”

ते म्हणाले, “माघे निमग्ना: सलिले सुशीते, विमुक्तपापा: त्रिदिवम् प्रयान्ति, म्हणजेच माघ महिन्यात कोणत्याही पवित्र जलाशयात स्नान करणे पवित्र मानले जाते. जगातील प्रत्येक समाजात नदीशी संबंधित परंपरा आहे. त्यामुळे आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, म्हणूनच त्याचा विस्तार आपल्याकडे पाहिला मिळतो.” तर भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच १०० दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे, – ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया, असं पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले की, माघ पौर्णिमेला संत रविदास जी यांची जयंती असते. संत रविदासांचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “तरुणांना कोणतेही काम करण्याच्या जुन्या मार्गाने बांधले जाऊ नये.” ते म्हणाले, आजही संत रविदास जी यांचे शब्द, त्यांचे ज्ञान आपल्याला मार्गदर्शन करतात.” संत रविदास म्हणाले होते की, आपण सर्व एकाच मातीची भांडी आहोत,असे पंतप्रधान म्हणाले,” मी माझे भाग्य समजतो की, मी संत रविदास जी यांच्या जन्मस्थान वाराणसीशी जोडलो गेलो आहे. मी संत रविदास जी यांच्या जीवनाची आध्यात्मिक उंची आणि तीर्थक्षेत्रातील त्यांची उर्जा देखील अनुभवली आहे. ”

दरम्यान, मन की बात हा पंतप्रधान मोदी यांचा दर महिन्याला प्रसारित होणार कार्यक्रम आहे, जो दर महिन्याच्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर प्रसारित होतो. आज त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे ७४ वे संस्करण आहे. या महिन्याच्या सुरूवातीस पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन या भागातील मन की बात कार्यक्रमात लोकांना वेगवेगळ्या विषयांवर सूचना मागितल्या होत्या.

First Published on: February 28, 2021 11:39 AM
Exit mobile version