कोरोनाचा सामना करण्यासाठी २३ हजार १२३ करोडची तरतूद, मनसुख मांडवीय यांची माहिती

कोरोनाचा सामना करण्यासाठी २३ हजार १२३ करोडची तरतूद, मनसुख मांडवीय यांची माहिती

लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यावरुन टीका करणाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी सुनावले खडेबोल

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर केंद्र सरकार आणि सर्वच मंत्र्यांनी जोमाने काम करण्यास सुरु केलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी पत्रकार परिषद घेत भविष्यातील कोरोनाच्या लाटेविरोधात लढण्यासाठी आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावाची तीसरी लाट आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या विचार करुन तयारी सुरु केली आहे. तिसऱ्या लाटेतील कोरोना प्रादुर्भावाविरोधात लढण्यासाठी २३ हजार १२३ करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पहिल्या आपत्कालीन पॅकेजचा वापर योग्य झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

नवे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात तयारी सुरु असल्याची माहिती दिली आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २३ हजार १२३ करोड रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनासंबंधीत उपाययोजनांवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी पहिलं हेल्थ पॅकेज १५ हजार करोड रुपयांचा जाहीर करण्यात आला होता. या पॅकेजचा चांगला वापर कले गेला. कोविड डेडिकेटेड हस्पिटल १६३ होते ते वाढवून ४३८९ झाले आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर एकही नव्हते परंतु या पैशांचा वापर करुन ८३३८ डेडिकेटेल कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले आहेत. तर कोविड सेंडर १०११ बनवण्यात आले आहेत. ऑक्सिजन बेड त्यावेळी ५० हजार होते त्याला वाढवून ४७३९६ तयार करण्यात आले असून याचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना झाला असल्याची माहिती मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशाला मोठ्या समस्यांना समोरे जावे लागेल या स्थितीला भविष्यात कशाप्रकारे सामोरे जायचे यासाठी दुसरे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये २३ हजार १२३ करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजचा वापर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने १५ हजार करोड देण्यात येणार असून राज्य सरकारकडून ८ हजार करोड रुपये खर्च केले जाणार असल्याचे मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. सर्व राज्य सरकारसोबत चर्चा केल्यानंतर उपाययोजना सुरु केल्या आहेत. देशात दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती यामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तयारी केली जाणार आहे. भविष्यात लहान मुलांना कोरनापासून कसं सुरक्षित ठेवलं जाईल याचा विचार करुन हे पॅकेज तयार करण्यात आले असल्याची माहिती मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

First Published on: July 8, 2021 8:11 PM
Exit mobile version