Omicron चा धोका कायम, निर्बंध शिथिल करणं पडेल महागात: WHO चा इशारा

Omicron चा धोका कायम, निर्बंध शिथिल करणं पडेल महागात: WHO चा इशारा

Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक मात्र खात्मा तेव्हाच...., WHO प्रमुखांचे मोठं विधान

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जगातील सर्व देशांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका अद्याप संपलेला नाही असा इशारा दिला जात आहे. WHO ने म्हटले की, जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन लाटेने धोक्याची पातळी गाठणे बाकी आहे. त्यामुळे कोविड – 19 चे निर्बंध हळूहळू शिथिल केले पाहिजेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर काम करणाऱ्या यंत्रणेने या सूचना दिल्या आहेत.

ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये WHO चे अधिकारी मारिया वेन म्हणाल्या की, अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने धोक्या पातळी गाठणे अद्याप बाकी आहे. यात अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा दर खूपच कमी आहे. या देशांतील असुरक्षित लोकसंख्येला कोविड-19 लस अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व निर्बंध एकाच वेळी हटवू नयेत.

मारिया वेन पुढे म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचे आवाहन केले आहे. कारण हा व्हायरस अधिक शक्तिशाली आहे. त्याच वेळी, WHO सरचिटणीस म्हणाले की, काही देशांचा असा समज आहे की, लसीकरणाचे चांगले दर आणि ओमिक्रॉनच्या कमी प्राणघातकता यामुळे धोका टळला आहे. हा व्हेरिएंट निश्चितपणे अत्यंत संसर्गजन्य असला तरी धोकादायक नाही त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही. पण असा विचार करणे चुकीचे आहे. कारण या वाढत्या संसर्गामुळे मृतांचा आकडाही वाढू शकतो.

पण यावर लॉकडाऊन हाच उपाय असल्याचे आम्ही म्हणत नाही. परंतु आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की, त्यांनी देशांतील नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगावे. कारण या महामारीशी लढण्यासाठी केवळ लस हे एकमेव शस्त्र आहे असे नाही. कोरोना महामारीविरुद्धचे युद्ध आपण जिंकले आहे, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन प्रमुख माईक रायन यांनी सर्व देशांना संबोधित करताना सांगितले की, प्रत्येक देशाने सध्याच्या परिस्थितीचे आकलन करून कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. इतर कोणताही देश नियम शिथिल करत आहेत म्हणून आपणही नियम शिथील केले पाहिजेत असे काही नाही.


Live Update : हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास फाटकला नागपूर पोलिसांकडूनही होणार अटक

First Published on: February 2, 2022 8:48 AM
Exit mobile version