Maratha Aarakshan : सुप्रीम कोर्टात २७ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

Maratha Aarakshan : सुप्रीम कोर्टात २७ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मराठा आरक्षण

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहणार की उठवली यावर लवकरच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण प्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी ठाकरे सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार याचा निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

काय आहे प्रकरण 

महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्या पीठाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती त्याच पीठा समोर ही सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात खंडपीठात न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्या. अजय रस्तोगी, न्या. हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे.

हेही वाचा –

‘मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी ४०० केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा!’

First Published on: October 16, 2020 11:43 PM
Exit mobile version