कोरोनाची दहशत! ‘या’ राज्यात पुन्हा मास्क सक्ती, अन्यथा 500 रुपयांचा दंड

कोरोनाची दहशत! ‘या’ राज्यात पुन्हा मास्क सक्ती, अन्यथा 500 रुपयांचा दंड

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतात अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढतेय. मुंबई, दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. दिल्लीत एकाच दिवसात कोरोनाचे 2000 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे सक्तीचे केले आहे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड आकरला जाईल. सरकारच्या अधिसूचनेनुसार, दंड खाजगी चारचाकी वाहनांमधून एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना लागू हा नियम लागू होणार नाही. यामुळे दिल्लीत मेट्रो, बस आणि सार्वजनिक ठिकाणी विना मास्क प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड आकरला जाणार आहे. दंड आकारण्यासाठी रस्त्या -रस्त्यावर पुन्हा मार्शल उभे केले जाणार आहे.

गेल्या एक आठवड्यापासून दिल्लीत दररोज सुमारे अडीच हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती नागरिकांना सतावू लागली आहे. त्याचवेळी वाढते रुग्ण लक्षात घेता, काही नमुन्यांची जीनोम अनुक्रम तपासणी केली गेली. जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये कोरोनाचा एक नवीन प्रकार आढळून आला. हे ओमिक्रॉन उप-प्रकार BA- 2.75 आहे.

दक्षिण जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की, लोक रुग्णालयात दाखल होत नाहीत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारवाईसाठी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. मास्क नसलेल्यांविरोधात कडक शिक्षा केली जाईल, जेणेकरून त्यांना मास्क घालण्याची सवय लागेल. मध्यवर्ती जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले की, मास्क परिधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच लोकांना कोरोनाची लस मिळावी यासाठी जनजागृती केली जात आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,146 रुग्ण आढळून आले, तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील संसर्ग दर 17.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी दिल्लीत कोरोनाचे 2495 नवीन रुग्ण आढळले होते. ज्यामुळे संसर्ग दर 15.41 टक्क्यांवरून 17.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे एकूण 8205 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 510 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 138 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. lj कंटेनमेंट झोनची संख्या 259 आहे.


देशात कोरोनाचा स्फोट; रुग्णसंख्येत 79 टक्क्यांची वाढ; दिल्लीत 2146 नवे रुग्ण

First Published on: August 11, 2022 12:16 PM
Exit mobile version