बसपा अध्यक्षा मायावतींचा स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार

बसपा अध्यक्षा मायावतींचा स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार

मायावती 

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी समाजवादी पार्टीशी युती केल्याबद्दल आपले मतं स्पष्ट केले आहे. पक्ष तसेच पक्षाच्या हालचालींच्या संदर्भात बसपा आगामी निवडणुका स्वबळावरच लढवणार असल्याचा निर्धार मायावती केला. या संदर्भातील माहिती मायावती यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.

बसपा आगामी निवडणुका स्वबळावरच लढवणार असल्याच्या या निर्धारामुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाशी त्यांचा कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी आघाडीकरून निवडणूक लढविली होती, मात्र या आघाडीचा कोणताच फायदा झाला नसल्याने मायावती यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सपा-बसपा आघाडीसंदर्भात सूचक विधान केलं होते. यादव समाजानं समाजवादी पार्टीला सोडलं आहे. समाजवादी पार्टीमध्ये सुधारणांची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत यादवांचे मतदान सपाला मिळाले नसल्याने उत्तर प्रदेशमधील विधानसभेची पोटनिवडणूक बसपा स्वबळावर लढवणार आहे, असे मायावती यांनी त्यावेळी सांगितले होते. यावर, अखिलेश यादव यांच्या सपासोबतचे आमचे संबंध संपलेले नाहीत, असंही त्यांनी त्यावेळी नमूद केले होते. त्यामुळे मायावती यांनी सपासोबतची आघाडी तोडली नसली तरी पोटनिवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे सपा-बसपा आघाडीमध्ये मायावतींनी थोडा ब्रेक घेत असल्याचे सुचित केले होते.

First Published on: June 24, 2019 11:59 AM
Exit mobile version