Medical Waste: कोरोनाने देशात तयार झाला ३८,६८० मेट्रिक टन मेडिकल वेस्ट

Medical Waste: कोरोनाने देशात तयार झाला ३८,६८० मेट्रिक टन मेडिकल वेस्ट

Medical Waste: कोरोनाने देशात तयार झाला ३८,६८० मेट्रिक टन मेडिकल वेस्ट

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्याचबरोबर कोरोनामुळे तयार होणाऱ्या मेडिकल वेस्टचे प्रमाणही वाढत आहे. देशात कोरोनामुळे वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे सरकारसमोर एक मोठे आव्हान आहे. रुग्णालय आणि घरांमधून कोरोना रुग्णांच्या वापरानंतर कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायवरण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही मार्गदर्शक तत्त्वेही निश्चित केली होती. या तत्वांची जबाबदारी केवळ सरकारची नसून सर्वसामान्यांची देखील असल्याचे त्यात म्हटले होते. देशात कोरोनाची संख्या वाढली आहे त्यामुळे कचऱ्यांचे ओझे देखील वाढले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३८ हजार ६४० मॅट्रिक टन वैद्यकिय कचरा तयार झाला आहे. (Corona produces 38,680 metric tons of medical waste in India)

पिवळ्या पिवशव्यांमध्ये कचरा रुग्णालय आणि घरांमधून प्लॉट पर्यंत पोहचतो.  घरातील आणि रुग्णालयातील कचरा वेगवेगळ्या ठिकाणी साठवून तो प्लॉटपर्यंत नेला जातो. प्लॉटमध्ये आल्यावर एका हेवी मशीनमध्ये तो जाळला जातो.  दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आला होता. कधी ७० किलो,७५ किलो तर कधी २०० किलो वैद्यकीय कचरा यायचा. आता हे प्रमाण २०-२५ किलो पर्यंत आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी ५३ मॅट्रिक टन कचरा येत होता. मे महिन्यात हा कचरा २२६ मॅट्रिक टन झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वैद्यकिय कचऱ्याचे प्रमाणे कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र,केरळ,कर्नाटक,आंध्र प्रदेश,तमिळनाडू,गुजरात,हरियाणा,उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये वैद्यकीय कचरा तयार करण्यात सर्वात अव्वल आहेत.

घरातील कचरा बाहेर टाकल्यावर तो गोळा करुन नेण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांची असते. कोरोनाच्या काळात त्यांची ही जबाबदारी आणखी वाढली. वेगवेगळ्या सेंटर्सवरुन कचरा गोळा करण्याची जबाबदारी बायोटिक वेस्ट लिमिटेड कंपनीकडे आहे. ही कंपनी दररोज २० रुपये प्रति किलो प्रमाणे कोरोना कचरा गोळा करते त्यानंतर कंपनी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावते. कोरोनाच्या काळात मात्र त्यांना योग्य वेळी पैसे न मिळाल्याच्या तक्रारी आहे. या काळात त्यांचे काम वाढल्याचे त्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. BMW या ट्रॅकिंग अँपचा वापर करुन दररोज कोरोना वैद्यकीय कचरा ट्रॅक केला जातो. या अँपचा वापर देशातील ७१ हजार कचरा सेंटर्सवर करण्यात येतो. दिवसाचा आकडा या अँपमध्ये टाकला जातो.


हेही वाचा – जुलै सप्टेंबर दरम्यान Covaxinला आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मंजूरी मिळण्याची शक्यता

 

First Published on: May 26, 2021 5:49 PM
Exit mobile version