जुलै सप्टेंबर दरम्यान Covaxinला आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मंजूरी मिळण्याची शक्यता

आतापर्यंत कोव्हॅक्सिनला १३ देशांनी मंजुरी दिली आहे.

bharat biotech re label vaccine stock dcgi allows extension expiry date 9 to 12 months
DCGI ने भारत बायोटेक लसींची एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवली, स्टॉक होणार रि-लेबल

भारत बायोटेकच्या कोव्हक्सिन (Covaxin) लसीला आपत्कालीन वापराच्या मंजूरीसाठी जिनेव्हात WHOकडे अर्ज करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनला WHO कडून येत्या जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे. (Bharat Biotech Covaxin is to receive WHO approval for emergency use between July and September) जगातील ६० देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मंजूरी मिळण्यासाठी नियामक संस्थांकडून प्रक्रिया सुरु आहे. यात ब्राझील आणि अमेरिका या देशांचाही समावेश असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. आतापर्यंत कोव्हॅक्सिनला १३ देशांनी मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत समावेश केलेला नाही. त्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी WHOने भारत बायोटेककडून आणखी महत्त्वाची माहितीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

WHOच्या अधिकृत वेबसाइटवर १८ मे रोजी जाहिर झालेल्या EUL मूल्यांकन प्रक्रियेतील कोरोना लसीच्या स्थितीबाबत नविनतम मार्गदर्शक अहवालात असे म्हटले होते की, भारत बायोटेकने १९ एप्रिल रोजी EOI सादर केला आहे. मात्र त्यासाठी अधिक माहिती हवी असल्याचे WHO ने म्हटले आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, लसीच्या आपत्कालीन वापराच्या प्रक्रियेसाठी परवानगी देण्याचा अर्ज हा अत्यंत गोपनीय आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराच्या मूल्यमापनासाठी सादर केलेले कागदपत्र यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या निकषांची पूर्तता झाल्यास WHO निर्णय घेईल असे सांगण्यात आले आहे.

भारतात सध्या इंडिया बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin), सीरम इन्स्टिट्यूची कोव्हिशिल्ड (Covishield)आणि रशियाची स्पुतनिक (Sputnik V) लस देण्यात येत आहे. कोव्हॅक्सिनला जानेवारी महिन्यात फुल क्लिनिकल डेटा शिवाय आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली. त्यामुळे देशव्यापी लसकरण मोहिमेला सुरुवात होताच अनेक वाद निर्माण झाले होते.


हेही वाचा – लसींचा पुरवठा सध्या मर्यादित,असला तरी सर्वांचे लसीकरण योग्य प्रकारे होईल-आर एस शर्मा