ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ‘मीशो’च्या 300 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ? कारण काय तर…

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ‘मीशो’च्या 300 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ? कारण काय तर…

ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘मीशो’ने सुमारे 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, यामुळे कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीची वेळ आली आहे. कंपनीकडून ग्रोसरी स्टोर्स बंद केल्यानंतर ही कारवाई करण्य़ात आली आहे. कंपनीने देशातील 90 टक्क्यांहून अधिक ग्रोसरी बिझनेस बंद केला आहे. याच कारणामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. कंपनीची आता फक्त नागपूर आणि म्हैसूरमध्ये हे स्टोर्स सुरु आहेत.

या प्रकरणी मीशोकडून सध्या कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही. कंपनीने आपल्या फॉर्मिसो बिझनेसचे सुपरस्टोअर म्हणून रिब्रँडिंग करताना 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यावेळी कंपनीने कारण दिले की, त्यांना ग्रोसरी बिझनेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. बिझनेस सध्या चालत नसल्याने कंपनीकडे पैसा येत नव्हता.

यापूर्वी कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेत कंपनीने सुमारे 200 लोकांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीकडे पुरेसा पैसा नसल्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवसायासाठी खूप पैसा वाया घालवला जात आहे. यामुळे मीशोने कोणत्याही प्लॅनशिवाय 6 राज्यांमध्ये याची सुरुवात केली. सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक अडचणीचे कारण बनत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना 2-2 महिन्यांचा पगार देऊन कामावरून काढून टाकले आहे. कंपनीचे सीईओ विदित अत्रे यांना सुपरस्टोअरला मीशोच्या मुख्य अॅपसह एकत्रित करायचे आहे.

कुठे होते स्टोर्स?

मीशोने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सुपर स्टोअर सुरू केले होते. कंपनीने कर्नाटकात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुपरस्टोअर सुरू केले. 2022 च्या अखेरीस 12 राज्यांमध्ये सुपरस्टोअर्स सुरू करण्याचे कंपनीचे लक्ष्य होते. एकीकडे कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना कमी करत आहे, तर दुसरीकडे आपल्या युजर्सची संख्या वाढत आहे. कंपनीने दावा केला की, मार्च 2021 नंतर त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या युजर्सची संख्या 5.5 पट वाढली आहे. मीशोने अलीकडेच 100 दशलक्ष युजर्सचा आकडा देखील पार केला होता.


मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी युती करणारे शिवसेनेला हिंदुत्व शिकवताहेत, शिवसेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल


First Published on: August 27, 2022 4:15 PM
Exit mobile version