भारतात येण्यास मेहुल चोकसी स्पष्ट नकार

भारतात येण्यास मेहुल चोकसी स्पष्ट नकार

मेहूल चोकसी (सौजन्य-फ्री प्रेस)

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोकसी याने भारतात येण्यास स्पष्ट नकार दिला असून हवे असल्यास इडीनेच अँटिग्वाला येण्यास सांगितले आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीसह पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोकसी याच्या वकिलाने न्यायालयात चोक्सीची तब्येत ठीक सांगितले होते. इडीने त्याच्याविरोधात मुंबईतील न्यायालयात फरारी घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावेळी चोकसीचे वकील, संजय अबोट यांनी चोक्सीची तब्येत खराब असल्याचे कारण दिले. तसेच त्याचा जबाब नोंदवायचा झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सींग किंवा इडीच्या अधिकाऱ्यांनी अँटीग्वाला जाऊन नोंदवावे, असेही वकिलाकडून सांगण्यात आले. अन्यथा तीन महिन्यांची वाट पहा, असेही अबोट यांनी न्यायालयाला सांगितले. जेव्हा चोकसी याची तब्येत सुधारेल तेव्हा तो भारतात येईल, असे सांगत इडीची याचिका रद्द करण्याची विनंती केली.

व्हिडीओच्या माध्यमातून दिले होते स्पष्टीकरण

दरम्यान, पीएनबी घोटाळा प्रकरणी परदेशात निघून गेलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांचा तपास सुरू असतानाच मेहुल चोकसी यांचा व्हिडिओ एएनआय एजन्सीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. आपला पीएनबी घोटाळ्याशी कोणताही संबंध नसून सक्तवसूली संचालनालय (Enforcement Directorate) विभाग आपल्यावर करत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे यामध्ये मेहुल चोकसी यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी स्वतःच्या पासपोर्ट रद्दीकरणावर भाष्य केले असून मेहुल चोकसीच्या वकिलांद्वारे एएनआयच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. या माध्यमातून त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

काय आहे नेमकं प्रकरण 

पीएनबीच्या १३४०० कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरा व्यापारी मेहुल चोकसीने गेल्या वर्षीच व्यवसायवाढीसाठी करेबियन देश अँटिग्वाची नागरिकता घेतली असल्याचा दावा केला होता. अँटिग्वाच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या बातमीनुसार, मेहुल चोकसीने अँटिग्वाच्या पासपोर्टवर १३२ देशात विनाव्हिसा फिरण्याची सूट असल्याचा दावा केला होता. ‘डेली ऑबर्झव्हर’नं दिलेल्या बातमीनुसार, चोक्सीच्या वतीनं त्याचे वकील डेव्हीड डोरसेटनं स्पष्टीकरण दिले. या स्पष्टीकरणात भारतीय तपास यंत्रणा आणि मीडियाकडून लावण्यात आलेले आरोप खोटे असून यात कोणतंही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटले होते.

वाचा : पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक

वाचा : माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे – मेहूल चोकसी

First Published on: November 18, 2018 8:47 PM
Exit mobile version