कोरोनामुक्तीची video तून शेअर करा Positivity !

कोरोनामुक्तीची video तून शेअर करा Positivity !

कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मलने सगळ जगच बदलून टाकले. पण या संकटाच्या काळात अनेकांनी कोरोनाच्या विषाणूसोबत दोन हात केले. प्रसारमाध्यमांमध्ये दररोज वाढणारे संसर्गाचे आकडे आणि मृत्यूदर यासगळ्या आकडेवारीने रोज मन तुटायचे सगळी परिस्थिती पाहून. पण त्याचवेळी आपले ओळखीतले, नात्यातली, जवळची कोरोनामुळे दगावणारी व्यक्ती या संकटात मनावरच दडपण आणखीन वाढवत होती. आजचा दिवस कोरोनाच्या संसर्गाने सुटला खरा, पण उद्या तो कुठे ना कुठे गाठेलच ही धास्ती कायम मनात रहायची. एकानंतर एक कुटूंबच्या कुटूंब कोरोनाने पॉझिटीव्ह अशा येणाऱ्या बातम्या मनातली धाकधुक आणखीच वाढवायच्या. पण अशा सगळ्या नकारात्मकतेच्या वातावरणातही माणुसकी जिवंत असण्याची उदाहरणे ही तितकाच मनाला आधार द्यायची. कोण डॉक्टरच्या रूपाने तर नर्स, वॉर्डबॉय, एम्ब्युलन्स ड्रायव्हरपासून ते घरी अनेक दिवस न गेलेले आरोग्य सेवेतील कर्मचारी यांची स्फुर्तीदायी एक गोष्ट जगण्याला आधार द्यायची. कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्याला अशा चिंतेच्या वातावरणात खरे इन्स्पिरेटर्स आणि जगण्याचे नवे बळ देणार हेच स्त्रोत होते. याच बळावर अनेकांनी कोरोनाच्या विषाणूला धोबीपछाड दिला आणि कोरोना विरोधातील लढाई जिंकली.

कुठे मित्र इन्स्पिरेटर्स झाले, तर कुठे जगण्याची जिद्द कायम असणारी वयोवृद्ध मंडळी. सगळ्यांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आधार मिळाला. हाच आधार पुढे कोरोनाच्या विषाणूला हरवण्यासाठीही तितकीच मजबुक ढाल झाला. या लढाईतून जिंकून आलेल्या या खऱ्या जिगरबाज अशा व्यक्तींकडूनच त्यांचे कोरोनावर मात करतानाचे अनुभव आम्ही आपल महानगर या वृत्तपत्रासाठी आणि mymahanagar या वेबसाईटच्या निमित्ताने मागवत आहोत. तुमच्या या सकारात्मकतेच्या लढाईला आम्ही व्यासपीठ मिळवून देतोय. तुमच्या या कठीण काळातली सकारात्मकता नक्कीच एखाद्याला विषाणूविरोधी लढण्याची पॉझिटीव्हीटी मिळवून देईल, हेच यामधून अपेक्षित आहे.

तुमचा पॉझिटिव्ह व्हिडिओ कुठे आणि कसा पाठवाल ?

कोरोनाला आपण सगळे हरवू शकतो, फक्त आपली मानसिक स्थिती खंबीर ठेवा. मानसिक स्थिती खंबीर असेल तर आपला कोरोनाविरुद्धचा लढा आणखी सोपा होईल, असा माझा अनुभव आहे. आपणही आपले चांगले अनुभव, कोरोनाशी तुम्ही कसा लढा दिला हे नक्की शेअर करा. आपले व्हिडिओ mymahanagarvideo@gmail.com या मेलवर किंवा 7506071006 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

 


 

First Published on: May 15, 2021 8:40 PM
Exit mobile version