Merry Christmas 2021: महेंद्र सिंह धोनी पत्नीसोबत करतोय ख्रिसमस सेलिब्रेट

Merry Christmas 2021: महेंद्र सिंह धोनी पत्नीसोबत करतोय ख्रिसमस सेलिब्रेट

Merry Christmas 2021: महेंद्र सिंह धोनी पत्नीसोबत करतोय ख्रिसमस सेलिब्रेट

आज देशभरात ख्रिसमस डे (Merry Christmas 2021)आनंदात साजर केला जात आहे. कोरोनाचे(Corona Virus) निर्बंध असल्याने प्रत्येकजण घरी राहूनच सेलिब्रेशन करत आहेत. तसेच यंदा आठवड्यातील शेवटचा दिवस असल्याने ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी अनेकांनी सुट्टी घेतली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णदार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आपल्या कुटुंबियासह ख्रिसमस साजरा करत आहे. धोनी त्याच्या सोशल मीडियावर ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक स्पेशल फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, क्रिकेटर महेंद्र सिंहच्या पत्नीने म्हणजेच साक्षीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांची मुलगी देखील दिसत आहे. हा फोटो एका पार्टी किंवा हॉटेलमधला दिसतोय आणि तेथील संपूर्ण डेकोरेशन हे ख्रिमससाठी खास सजवण्यात आलं आहे. माहितीनुसार साक्षी आणि धोनी सध्या युएईमध्ये(UAE) आहेत, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दोघेही परदेशात गेले आहेत.

 

चैन्नई सुपर किंग्सला चैथ्यांदा आपल्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाअंर्गत विजय मिळवून दिल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी त्याच्या पत्नीसह अनेक पार्टीमध्ये सहभागी होतो. नुकतंच धोनीने आपल्या संपूर्ण कुटुंबांसोबत जयपुरमध्ये लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी गेले होते. यावेळी देखील साक्षीने त्यांचे अनेक खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.इंटरनॅशनल क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर धोनी चैनई किंग सोबत आगामी सामन्यात देखील क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.


हे हि वाचा – 83 Box Office Collection Day1: पहिल्याच दिवशी ८३ची बॉक्स ऑफिसवर १५ कोटींची कमाई

First Published on: December 25, 2021 3:57 PM
Exit mobile version