#MeToo: लैंगिक शोषणाच्या अधिक तपासासाठी समिती स्थापणार

#MeToo:  लैंगिक शोषणाच्या अधिक तपासासाठी समिती स्थापणार

MeToo

हॉलीवूडमधून सुरु झालेल्या #MeToo अभियानाची लाट आता भारतातही उसळली आहे. आता अनेक नवे चेहरे यामध्ये समोर येत आहेत. आता महिला आणि बालविकास मंत्रालयाने महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून त्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भातील सुनावणी साठी ४ निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

काय दिली माहिती?

शुक्रवारी मनेका गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ न्यायमूर्ती आणि कायदा विशेषज्ञ यांचा यामध्ये समावेश असणार आहे. आणि #MeToo अंतर्गत येणाऱ्या सगळ्या प्रकरणांची अधिक तपासणी करणार आहे असे सांगितले.शिवाय त्यांनी यावेळी झालेल्या घटनांचा निषेध करत या सगळ्या प्रकारात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही माहिती देताना त्यांनी या समितीत कोण कोण असणार याची माहिती दिलेली नाही.

काय म्हणाल्या मनेका गांधी ?


 

First Published on: October 12, 2018 7:27 PM
Exit mobile version