महाराष्ट्र सोडून संपुर्ण देशात ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु होणार

महाराष्ट्र सोडून संपुर्ण देशात ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु होणार

देशभरात अनलॉक ४ ची सुरुवात झाल्यामुळे आता ७ सप्टेंबर पासून मेट्रो पुन्हा रुळावर येणार आहे. केंद्र सरकारने ७ तारखेपासून मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मेट्रो रेल्वेची SOP (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली आहे. मागच्या पाच महिन्यांपासून पुर्ण देशामध्ये मेट्रोची सेवा बंद आहे. देशातील १८ शहरांमधील १२ मेट्रो सेवा सुरु होणार आहेत. कालबद्ध पद्धतीने हळुहळु मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मेट्रो सुरु करण्यात येणार नाही.

एंट्री गेटवर सॅनिटायजरची सुविधा

मेट्रोच्या एंट्री गेटवर सॅनिटायजर स्प्रे लावलेला असेल. त्यासोबतच ज्या ठिकाणी टोकण वापरायचे आहेत. त्याठिकाणी सॅनिटाइजेशन केल्यानंतरच आतमध्ये येण्याची परवानगी दिली जाणार आहे. मेटरलच्या वस्तूंची स्क्रिनिंग सुरुच राहिल. यासोबतच इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि एज्युकेशन असे अभियान राबविले जाईल. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्कचे बंधन घालण्यात आलेले आहे.

१२ सप्टेंबर पासून सर्व कॉरीडोरची सेवा सुरु होणार

देशभरात ७ सप्टेंबरपासून मेट्रो अधिकृतरित्या सुरु होणार असली तरी एखाद्या राज्यात एक पेक्षा जास्त असलेले कॉरीडोर टप्प्याटप्प्याने १२ सप्टेंबर पर्यंत सुरु करण्यात येणार आहे. तसेच सुरुवातील मेट्रोच्या कमी फेऱ्या चालविल्या जातील. ज्यामध्ये तासांची मर्यादा असेल. त्यानंतर हळुहळु फेऱ्यांची मर्यादा आणि तास वाढविले जातील.

कंटेन्मेंट झोनमध्ये उतरता-चढता येणार नाही

कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी मेट्रोचे आत-बाहेर येण्याचे दरवाजे बंद असतील. कंटेन्मेंट स्थानकावर ना उतरता येऊ शकते, ना चढता येऊ शकणार. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे विशेष ध्यान राखले जाणार आहे. मेट्रो स्टेशन आणि बाहेर डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी मार्किंग केले जाणार आहे. मेट्रोमध्ये जर कुणी विनामास्क आले तर मेट्रो स्थानकावर मास्क विकत घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रवाशी तिथे मास्क खरेदी करु शकता.

First Published on: September 2, 2020 7:48 PM
Exit mobile version