शरीराचा घाम रोखण्यासाठी मेक्सिकन मॉडेलने ऑपरेशन केले, पण घडल भलतच

शरीराचा घाम रोखण्यासाठी मेक्सिकन मॉडेलने ऑपरेशन केले, पण घडल भलतच

शरीरातून सतत येणाऱ्या घामाला कंटाळून एका मॉडेल बॉडी बिल्डरने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला खरा. पण हा निर्णय महिलेल्या जीवावर बेतण्याचे कारण ठरला आहे. हे ऑपरेशन महिलेच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. मेक्सिकन फिटनेस इनफ्लूएंसर आणि बॉडी बिल्डर ओडालिस सेंटोस मेना या महिलेने सतत येणाऱ्या घामामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. पण ऑपरेशन नंतर काहीच दिवसांमध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. अवघी २३ वर्षीय फिटनेस मॉडेल ही इंस्टाग्रामवर अत्यंत लोकप्रिय होती. इंस्टाग्रामवर या मॉडेलचे १ लाख ४७ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या बॉडी आणि फिटनेसच्या फोटोंमुळे ही मॉडेल अत्यंत लोकप्रिय होती. आपले अनेक फोटो या मॉडेलने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ग्वाडलजारा येथील एका प्रसिद्ध अशा स्किनपील क्लिनिकमध्ये या महिलेवर मिराड्राई नावाचे ऑपरेशन झाले. एंटीपर्सपिरेंट उपचार पद्धतीला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी या मॉडेलने ऑपरेशन केले. पण हे ऑपरेशन अयशस्वी ठरल्याने मॉडेलचा जीव गेल्याचे समोर आले आहे.

काय होते नेमके ऑपरेशन ?

मिराड्राई या ऑपरेशनच्या प्रक्रियेत घाम तयार करणाऱ्या ग्रंथी या हिट एनर्जीचा वापर करून ऑपरेशनच्या मदतीने काढून टाकल्या जातात. या ऑपरेशनमुळे मॉडेलच्या महिलेच्या काखेतून घाम येणे बंद झाले तसेच शरीरातून येणारा वासही कमी झाला. महत्वाचे म्हणजे या ऑपरेशनमुळे महिलेच्या काखेतील केसही कमी झाले होते. पण ऑपरेशनच्या प्रमोशनचा निर्णय हा मॉडेलच्या जीवावर बेतणारा ठरला आहे. या ऑपरेशननंतर महिलेला ह्दयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. या ह्दयविकाराच्या झटक्यामुळेच या मॉडेलचा जीव गेल्याचे कळते. ऑपरेशनसाठी अॅनेस्थिशिया वापराचा परिणाम हा ह्दयविकाराच्या झटक्याचे कारण ठरले आहे. या ह्दयविकाराच्या झटक्यानंतर क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी मॉडेलला सीपीआरच्या माध्यमातून प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला खरा, पण हे प्रयत्नही अयशस्वी ठरले. एंटीपर्सपिरेंट सर्जरी ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा प्रचार ही मॉडेल करत होती, पण हीच उपचार पद्धती मॉडेलच्या जीवावर बेतण्यासाठी कारणीभूत ठरली.


 

First Published on: July 15, 2021 7:28 PM
Exit mobile version