…तर विमानातील मधल्या प्रवाशांना संरक्षणात्मक उपकरणे पुरवणे आवश्यक – DGCA

…तर विमानातील मधल्या प्रवाशांना संरक्षणात्मक उपकरणे पुरवणे आवश्यक – DGCA

देश अनलॉक १ अंतर्गत पुन्हा ट्रॅकवर परत येण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा काम सुरू करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रासाठी काही नियम व मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. दरम्यान, नागरी उड्डाण संचालनालयाने विमान कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. विमानंमध्ये मधल्या जागा रिकामा ठेवाव्यात जेणेकरुन सोशल डिस्टंसिंगचं पालन करता येईल. जर विमानातील सर्व सीट बुक झाल्या असतील तर प्रवाशाला मास्क, फेस शिल्ड यासह प्रवाशाला गाऊन द्यावा, असं नागरी उड्डाण संचालनालयाने म्हटलं आहे.


हेही वाचा – अनलॉक १.० चा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स १०५० अंकांनी वधारला


२५ मेपासून सरकारने देशांतर्गत उड्डाणाला परवानगी दिली आहे. यासाठी सरकारने लोकांच्या सोयीसाठी तिकिटांचे दरही निश्चित केले होते. नागरी उड्डाण मंत्रालयाने २००० ते १८,६०० रू. भाडे निश्चित केलं आहे. गृह मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा स्थगित केली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

 

First Published on: June 1, 2020 3:58 PM
Exit mobile version