हातात नोकरी नाही, डोक्यावर छत नाही…हताश झालेल्या त्याने अखेर आत्महत्या केली!

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सगळे चालत आपल्या गावी निघाले आहेत. लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गेली या कारणामुळे २० वर्षीय एका प्रवासी मजुराने आत्महत्या केली. गुजरातच्या झुग्गी- बस्ती परिसरात बुधवारी ही घटना घडली. सुनील रिजाजगन महली असं या मृत व्यक्तीचे नावं आहे. घराच्या घताला गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

पोलीस डी. के. पटेल म्हणाले की, मृत व्यक्ती आपल्या साथीदार मजुरांबरोबर रहात होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. इतर मजुरांप्रमाणे तो आपल्या गावीही जाऊ शकत नव्हता. अजून तरी आत्महत्येचे कारण समजले नाही पण प्रथमदर्शनी नोकरी गेल्यामुळे आणि गावी न जाऊ शकत असल्यामुळे आत्महत्या केल्याचे समजत आहे.

दुसरीकडे गुजरातमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना थांबवण्यासाठी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी संक्रमणाविरूद्ध लढा देण्यासाठी आठवड्याभरासाठी ऑनलाईन मोहीम राबविण्याची घोषणा केली. रुपाणी म्हणाले की, २१ मे ते २७ मे या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे उद्दीष्ट कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या तीन मूलभूत नियमांविषयी लोकांना जागरूक करण्याचे आहे. मुलांनी आणि वृद्धांनी घरातच राहायचं आहे, मास्क न घालता अजिबात बाहेर पडायचं नाहीये. आणि नेहमीच सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेचं नाव ‘मी पण कोरोना वॉरियर’ असं आहे. त्याने एका व्हिडिओद्वारे दिलेल्या संदेशात सांगितले की, “आता कोरोना विषाणूविरूद्ध थेट लढा आहे. आपल्याला कोरोना विषाणूंसह जगावे लागेल आणि संघर्ष करावा लागेल. मी लोकांना नेहमी जागरुक राहण्याची विनंती करतो. त्यासाठी ही आठवडाभराची मोहीम सुरू केली जात आहे. असे ते पुढे बोलताना म्हणाले.


हे ही वाचा – सेवानिवृत्त सासरा, सुनेच्या डोक्यावर बंदूक ठेवून करायचा वारंवार बलात्कार!


 

First Published on: May 21, 2020 8:01 AM
Exit mobile version